व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी माण 258 विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रीय काँग्रेसकडे घ्यावा तसेच किसान काँग्रेस प्रवर्गातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रा. विश्वंभर बाबर यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्याकडे जोरदार फिल्डिंग लावली असून राष्ट्रीय स्तरावरील अनेक वरिष्ठाच्या त्यांनी नुकत्याच गाठीभेटी घेतल्या आहेत. नाशिक येथे नुकतीच प्रदेश किसान काँग्रेस च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयाचे कार्यालयीन सचिव प्रणव झा , राष्ट्रीय किसान काँग्रेसचे प्रशासन व संघटन उपाध्यक्ष अखिलेश शुक्ला , महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्टे यांच्यासह प्रदेश किसान काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस प्रवर्गातून राज्यातील 12 इच्छुकांची यादी राष्ट्रीय किसान काँग्रेस कार्यालयाकडे दिली आहे. या यादीत कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांचा अग्रक्रमाने पाचवा क्रमांक आहे. कृषी क्षेत्रातील तज्ञ तसेच सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून आपणाला माण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे