प्रवीण दादासो इंगवले यांना – केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट तपास पदक ने सम्मानित
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
महेशराव जाधव
दहिवडी :
सातारा जिल्हयातील , माण तालुकातील , बिदाल गावचे सुपुत्र श्री. प्रवीण दादासो इंगवले , आईपीएस , येसपी एनआईए , मुंबई यांना – केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट तपास पदक ( Union Home Minister Medal for Excellence in Investigation 2023 ) ने सम्मानित करण्यात आले.
प्रवीण इंगवले हे २०१७ च्या तुकडीचे आईपीएस अधिकारी असुन त्यांचे केडर मणिपुर आहे. मणिपुर मध्ये एसपी असताना त्यानी गुन्हे तपासात नवीन्यपूर्ण , तांत्रिक व जलद तपास करूँन आरोपीना कठोर शिक्षा होण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचा केंद्रीय गृह मंत्रालय तर्फ़े सम्मान करण्यात आला आहे.