प्रशांत कदम (माजी सैनिक) अध्यक्ष सातारा जिल्हा यांच्यावतीने सैनिक संपर्क अभियान दौऱ्याचे आयोजन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड प्रतिनिधी :

      सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन अध्यक्ष प्रशांत कदम यांनी सैनिक संपर्क अभियानाचे आयोजन केले होते अभियानामध्ये माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय व शहीद जवान कुटुंबियांनी महसूल दरबारी व पोलीस प्रशासन दरबारी प्रलंबित असलेल्या अडचणी सांगितल्या त्याबद्दल चर्चा करण्यात आली व तेथील विभागाला भेटून व त्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

      तदनंतर या दौऱ्या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीवर चर्चा करण्यातआली. त्या मध्ये काही सैनिकांनी प्रामुख्याने मुद्दे मांडले की येथील सरकार व जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी सैनिकांचे कोणते ही काम वेळेत करत नाहीत सैनिकांचे व शहीद जवान कुटुंब यांचे प्रश्न सन 1971 व 1999 युद्धा मध्ये जवान शहीद झाले परंतु आज तागायात त्यांच्या कुटुंबाला न्याय भेटला नाही अशी खंत अभियानादरम्यान व्यक्त केली गेली अनेक सरकार दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या सैनिकांनी बोलून दाखवल्या या बाबत चर्चा करण्यात आली

    व यामध्ये कोरेगाव तालुक्याच्या माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी, शहीद जवान कुटुंबियाणी निर्णय घेतला की येणाऱ्या लोकसभेला सैनिकांचा प्रतिनिधी म्हणून प्रशांत कदम (माजी सैनिक) यांना पूर्णपणे पाठिंबा आहे व आपण सातारा लोकसभेसाठी अर्ज भरावा व आमचा प्रतिनिधी म्हणून सैनिकांचा आवाज देशाच्या लोकसभेत पोहोचवावा.आम्ही सैनिक म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत सातारा जिल्ह्यातील सैनिक व त्यांचे कुटुंबीय निरणायक आहे तरी आपण सातारा लोकसभा निवडणुक लढवावी अशी सर्व माजी सैनिक, शहीद जवान कुटुंबीय यांनी विनंती केली.

       या प्रसंगी कॅप्टन अंकुश जाधव (नि.), सुभेदार तानाजी साळुखे(नि.),माणिक शिंदे, शहीद वीर जवान बंधू संतोष भोईटे, सदाशिव नागणे अध्यक्ष कराड तालुका,श्री. शशिकांत वीर, सागर सुतार, श्रीकृष्ण जाधव, शंकर पवार, सुभेदार संतोष बर्गे (नि.), सौ संगीता सुतार सरपंच रूई, सौ विद्या बर्गे, अध्यक्ष सातारा जिल्हा महिला ब्रिगेड, सौ सीमा पवार अध्यक्ष महिला ब्रिगेड कोरेगाव तालुका, श्रीमती मंगला जाधव उपाध्यक्ष सातारा जिल्हा महिला ब्रिगेड, सौ नीता दनाने संघटक कोरेगाव तालुका महिला ब्रिगेड, सौ कविता साळुंखे, सौ दिपाली देशमुख, संगीता बर्गे सर्व माजी सैनिक, सैनिक पत्नी, शहीद जवान कुटुंबीय उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!