प्रसाद भास्कर पोरे, (न्यायाधिश, लेबर कोर्ट नागपूर) यांचे आज नागपूर येथे आकस्मित निधन
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड/शिरवळ
प्रसाद भास्कर पोरे, (न्यायाधिश, लेबर कोर्ट नागपूर) यांचे (दि ५ डिसे.)नागपूर येथे आकस्मित निधन झाले त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पोरे कुटुंबावर दुख्खाचे सावट पसरले आहे
प्रसाद भास्कर पोरे, (वय ४५) हे मुळचे म्हसवड येथील असून ते ना.स.प चे सातारा जिल्हा अध्यक्ष इंजि.श्री सुनील श्रीधर पोरे साहेब यांचे पुतणे होत व सातारा बारचे सभासद होते ते शिरवळ येथे कुटुंबासह स्थाईक झाले होते त्यांची ठाणे, जुन्नर, उस्मानाबाद, नागपूर आदी ठिकाणी न्यायाधीश म्हणून कारकीर्द झालेली होती त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरवळ येथे तर,वकीली शिक्षण सातारा इस्माईल लाॅ काॅलेज येथे पूर्ण केले आणी सध्या ते लेबर कोर्ट नागपूर येथे न्यायाधिश म्हणून कार्यरत होते त्यांना एक मुलगा व पत्नी,आई भाऊ विवाहित बहिण असा त्याचा परिवार आहे दि पांच रोजी सायंकाळी उपचारा दरम्यान नागपूर येथे त्यांचे अकस्मित निधन झालेले आहॆ, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, तसेच त्यांचे कुटुंबास या दुःखातून सावरण्याची ताकद देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना*