समाज संघटन व त्यातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील चांगले उपक्रम राबविणे हे राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान चे कार्य स्तुत्य असून समाजाच्या वतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेराजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान पठार विभाग तर्फे २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सातारा-जावली चे आ.छ. शिवेद्रसिंहराजे भोसले व माजी जिल्हा परिषद सदस्य राजु (भैय्या) भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ सांवत, बीएमसी अधिकारी सुभाषराव येळे, धनगर समाजाचे नेते अशोक शेडगे, समाजसेवक राजू गोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय शेडगे, युवा उद्योजक काशिनाथ केंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित झालेली ही दुसरी दिनदर्शिका आहे.
समाजाभिमुख उपक्रम कौतुकास्पद : राजू भोसले
राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान पठार विभाग तर्फे दुर्गम व डोंगराळ भागातील लोकांसाठी नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात. संस्थेने सर्वसामान्यांसाठी उभारलेले सामाजिक कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांना लागणारे सर्वोतोपरी सहकार्य करून कायम दुर्गम डोंगराळ भागातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य राजू (भैय्या) भोसले यांनी केले.
यावेळी बाजार समितीचे युसूफ भाई पटेल, समाजसेवक सुरेंद्र आण्णा जानकर, घाडगे सर, दिलीप चव्हाण, कोंडीबा केंडे, श्री.पिंपळे, प्रकाश चाळके, तानाजी शिंदे, संजय आवकिरकर, प्रकाश आवकिरकर, प्रविण काळे, दिपक शेळके, अजय कोकरे, कोंडीबा कोकरे, प्रदिप केंडे,भगवान बावधाने, महेश बावधाने, दिनकर मेळाट यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला.