पुळकोटीत प्रभाकर घार्गे यांच्या प्रचाराला जोर, अनिलभाऊ देसाई यांचे घार्गे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
पुळकोटी (ता. माण):
माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या प्रचार सभेला गावात जोरदार प्रतिसाद मिळाला. पुळकोटी येथे आयोजित प्रचार सभेत प्रभाकर घार्गे यांच्यासमोर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व माण-खटावचे ज्येष्ठ नेते अनिलभाऊ देसाई यांनी गावकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी महाविकास आघाडीच्या धोरणांवर प्रकाश टाकत घार्गे साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
अनिलभाऊ देसाई यांनी बोलताना, “प्रभाकर घार्गे हे एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करणारे नेते आहेत. त्यांनी नेहमीच शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी संघर्ष केला आहे. त्यांना विधानसभेत पाठवले तर तालुक्याच्या विकासाला नवे परिमाण मिळेल,” असे मत व्यक्त केले.


