मी राजकारणात आलो आहे ते केवळ बेरोजगारी अन पाणी प्रश्नासाठीच : प्रभाकर देशमुख
व्हिजन २४ तास न्यूज
BY ;Ahmad Mulla
म्हसवड;
मी राजकारणात आलो आहे ते केवळ बेरोजगारी अन पाणी प्रश्नासाठी या दोन प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माझा संघर्ष सुरु असुन लवकरच हे दोन्ही प्रश्न मार्गी लागल्याचे आपणाला दिसतील. म्हसवड शहरात जो कॉरिडोर प्रकल्प मंजुर आहे तो प्रकल्प आपण कोणत्याही परिस्थितीत बाहेर जावु देणार नाही, त्यासाठी जो काय संघर्ष करावा लागेल त्यासाठी आमची तयारी आहे यासाठी काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती आपणाला चांगलीच आहे त्यामुळे इतरांप्रमाणे माझी दुटप्पी भुमिका कदापी नसणार आहे.
म्हसवड येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देशमुख यांच्या वाढदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या तर प्रभाकर देशमुख यांना यापुढे माणचा आमदार बनवण्यासाठी तन, मन एक करून माणचा इतिहास नवा घडवण्याचा निश्चय केला. यावेळी कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्यावर टिका करणाऱ्या विरोधकांचा खरपुस समाचार घेतला तर कार्यकर्त्यांच्या भावना समजावुन घेत त्यांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख म्हणाले की माण-खटावमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व करताना स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आपली राजकिय वाटचाल सुरु असल्याचे सांगितले, तर आपणावर बोलणार्या सर्व विरोधकांचा मी हिशोब ठेवला असुन योग्य वेळी मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देईन, सध्या माझ्यावर बोलण्यापेक्षा माण-खटावच्या प्रश्नावर
बोलावे येथील बेरोजगारी, अन पाणी प्रश्नासाठी प्रयत्न करावेत, . म्हसवड शहरातील पाणी पुरवठा योजना अत्यंत जुनी झाली आहे ती नव्याने प्रस्तावित करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी मंजुर केला आहे, महाविकास आघाडीने निधी मंजुर केलेल्या विकास कामांचे श्रेय सध्याचे राज्य शासन घेत आहे.
प्रत्येकाने शिक्षणासाठी प्रयत्न करावेत, प्रत्येक पालकांनी वाटते आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्याचे भवितव्य चांगले घडेल अशा प्रकाची शाश्वती देण्याचे पहिले काम मी करायचे ठरवले आहे , तर प्रत्येक पुढाऱ्याने ने आपल्या भागातील शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत. सामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत याची पुर्ण जाण आपणाला आहे त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात जे आहे ते यापुढे निश्चित होईल तर यापुढील प्रत्येक निवडणुकीत आपण सर्वांनी राष्ट्रवादी च्या पाठीशी ठाम रहावे असे आवाहन शेवटी देशमुख यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवा नेते जयराज राजेमाने, परेश व्होरा, चंद्रकांत केवटे, राजेंद्र कोले, सचिन लोखंडे, यांनी वाढदिनाच्या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश माने यांनी तर सुत्रसंचालन इंद्रायणी जवळकर यांनी केले. यावेळी म्हसवडमधील सामान्य जनतेने देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केल्याचे दिसुन आले.
राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांना वाढदिनाच्या शुभेच्छा देताना अभयसिंह जगताप, प्रा. विश्वंभर बाबर, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, सुभाष नरळे, अँड. पृथ्वीराज राजेमाने, किशोर सोनवणे, श्रीराम पाटील, दिलीप तुपे, अँड. राजु भोसले आदींनी देशमुख हे माण- खटावच्या सामान्य जनतेच्या मनातील आमदार असल्याचे म्हणाले तर आगामी विधानसभा निवडणुकीत देशमुख यांना आमदार म्हणुन विधानसभेत पाठवण्याचे आवाहन केले