विकासाची दृष्टी नसणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता गेली, यामुळे म्हसवड शहर बकाल वस्ती झाले आहे.-आ. जयकुमार गोरे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड शहराला आधुनिक मॉडेल सिटी बनविणार -आ.जयकुमार गोरे.
म्हसवड प्रतिनिधी.
विकासाची दृष्टी नसणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता गेली, यामुळे म्हसवड शहर बकाल वस्ती झाले आहे. सध्या
म्हसवड शहराचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर असून माता-भगिनींना पाण्यासाठी अनेक यातना भोगाव लागतात म्हसवडकर यांचे पाण्याचे दुःख दूर करण्यासाठी 80 कोटी रुपये खर्चाची म्हसवड शहरासाठी स्वतंत्र २४ तास स्वच्छ पाणी देण्याची. पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून या पाणी योजनेचा भूमी समारंभ व विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ दिनांक ११ रोजी म्हसवड येथे होणार असून येथे या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येणार असून त्यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ होणार आहे या कार्यक्रमाला खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर,आ. राहुल कुल उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत द्वारे केलेला आहे.
म्हसवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
.
म्हसवड शहरातील जनतेने मागल्या पाच वर्षांमध्ये परिवर्तनाच्या नावाखाली सत्तांतर केलं मात्र या परिवर्तन करणाऱ्या सत्ताधारी लोकांनी मसवड शहराची पूर्ण वाट लावली असून म्हसवड शहराला वीस वर्षे पाठीमागे गेलेले आहे वीस वर्षांपूर्वी म्हसवड शहराची जी दयनीय अवस्था झालेली होती. तीच अवस्था आजही झालेली आहे. हे पाहता म्हसवड शहराला नवीन विकासाला दिशा देण्यासाठी आता भविष्य काळामध्ये आम्ही अधिक विकासाची कामे करून शहराचा पूर्व चेहरा मोहरा बदलून शहर आधुनिक मॉडेल सिटी बनवणार आहे .पाच वर्षांपूर्वी मंजूर असणारी कामे सुद्धा सत्ताधारी गटाला पूर्ण करता आली नसून कोठ्यावरील रुपयांचा फंड नगरपालिकेच्याकडे शिल्लक होता हा फंड सत्ताधारी गटाच्या नाकर्तेपणामुळे परत गेला असून अर्धवट राहिलेली कामे सुद्धा गेल्या पाच वर्षांमध्ये पूर्ण करता आली नाहीत हे म्हसवड शहराचे मोठे दुर्दैव असून गेल्या पाच वर्षांमध्ये म्हसवड शहरांमध्ये कोणतेही विकास काम झाले नाही म्हसवड शहराची अवस्था अत्यंत वाईट झाली असून शहरातील अंतर्गत रस्ते एका पावसात वाहून गेले आहे तर म्हसवड शहरांमध्ये बांधण्यात आलेल्या गार्डनची दयनीय अवस्था झाली असून गार्डन मध्ये आता जनावरे फिरू लागलेली आहेत तर अत्यंत सुसज्ज बांधलेली स्मशानभूमी अत्यंत गलिच्छ झाली असून या स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा सुद्धा नगरपालिकेला देता आल्या नाहीत हे पाहता म्हसवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनाच्या नावाखाली केवळ कमिशन राज सुरू होते हे कमिशन राज सुरू असल्यामुळे गेल्या पाच वर्षात शहरात झालेली निकृष्ट दर्जाचे कामे पाहता म्हसवड शहर बकाल वस्ती झालेल्या आहे असेही आमदार जयकुमार गोरे यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले माण तालुक्यामध्ये परिवर्तनाच्या नावाखाली काही नेते मंडळी लोकांची दिशाभूल करीत असून अशा दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून आता सावध होण्याची गरज आहे. म्हसवड शहरांमध्ये आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होतो आणि जे पाणी मिळतं ते दूषित असतं माता-भगिनीचे दुःख कमी करण्यासाठी व पाण्याच्या त्रासातून जनतेला मुक्त करण्यासाठी म्हसवड शहरासाठी 80 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून म्हसवड येथे अहिल्यादेवी व्यापार संकुल उभा करण्यात येणार आहे या व्यापार संकुलाचा भूमिपूजन समारंभ यावेळी करण्यात येणार आहे .
तसेच आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन हि यावेळी होणार असल्याची माहिती दिली त्यामध्ये म्हसवड नगरपरिषद हद्दीत उद्यम नगर क्रमांक एक अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम करणे तसेच सातारा पंढरपूर रोड अप्रोच ते मरीआई मंदिर रस्ता डांबरीकरण करणे बनगरवाडी बेघर वसाहत अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे मल्हार नगर अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे सातारा पंढरपूर अप्रोच ते मेरी माता हायस्कूल रस्ता डांबरीकरण करणे म्हसवड नगर परिषद हद्दीतील वीरकरवाडी देवापुर अप्रोच राखुंडे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे अहिल्याबाई होळकर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे करणे दहिवडे मळा ते नागोबा मंदिर रस्ता डांबरीकरण करणे राऊतवाडी रस्ता डांबरी करण करणे लांब मळा रस्ता डांबरीकरण करणे दहिवडी मळा ते नागोबा रस्ता भाग क्रमांक दोन डांबरीकरण करणे बनगरवाडी रस्ता डांबरीकरण सातारा पंढरपूर अप्रोच विरकर मळवी रस्ता डांबरीकरण करणे पंतवस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे अशी सात कोटी 75 लाख 58 हजार 681 रुपयांच्या कामाची भूमिपूजन व 13 कोटी रुपयांचे भूमिपूजन होणार आहेत या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन . माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.