रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित मुजवण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कराड उत्तर यांचा निवेदनाद्वारे इशारा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड : प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम उपविभाग उत्तर कराड यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे वतीने कराड उत्तरचे तालुकाप्रमुख .संजय भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली बांधकाम अधिकारी .सावंतसाहेब त्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की राज्य मार्ग क्रमांक 142 विद्यानगर ते मसूर व कोरेगाव फाटा ते खराडे फाटा ते तारगाव रेल्वे स्टेशन तसेच खराडे फाटा ते रहिमतपूर त्याचप्रमाणे राज्य मार्ग क्रमांक 124 ओगलेवाडी ते शामगाव या दोन्ही रस्त्यांना खड्डे पडलेले .आहेत. त्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या दोन्ही रस्त्याच्या पडलेल्या खड्ड्यांची त्वरित दखल घेऊन ते ताबडतोब मुजवण्यात यावेत अशा सूचनानिवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
या प्रसंगी बांधकाम विभागाचे अधिकारी सावंत साहेब यांनी लवकरात लवकर खड्डे मुजवतो असे आश्वासन दिले अन्यथा आसै निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी करण्यात आली व या रस्त्यावरती अपघात होऊन जीवित हानी झाल्यास संबंधित ठेकेदारावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे व शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे घट कराड उत्तर यांच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे


