मसूर–बलवडी फाटा रस्त्यावरील खड्डे २५ जानेवारीपर्यंत बुजवा अन्यथा २६ जानेवारीला आंदोलन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड:-प्रतिनिधी
मसूर ते बलवडी फाटा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालक, प्रवासी व शेतकऱ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांसह उसाच्या बैलगाड्या व उसाने भरलेले ट्रॅक्टर यांना मोठी कसरत करावी लागत असल्याने दिवसातून किमान एक अपघात घडत असल्याचे चित्र आहे.

खड्डे चुकवताना वाहनचालकांची तारेवरची कसरत होत असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, कराड उत्तर यांनी सदर रस्त्यावरील खड्डे २५ जानेवारीपर्यंत तातडीने बुजवावेत, अन्यथा २६ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
हे आंदोलन च्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती कराड उत्तर तालुकाप्रमुख संजय भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. खड्डे न बुजवल्यास आंदोलनास कारणीभूत ठरणारी सर्व जबाबदारी संबंधित बांधकाम विभागाचीच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिक, वाहनचालक व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

