हिंगणी येथे पोस्ट कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन; अनेक वर्षांची प्रतीक्षा व मागणी पूर्ण-आजपासून मुक्काम पोष्ट हिंगणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

शकील मुल्ला

म्हसवड/हिंगणी : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील, माण तालुक्यातील शेवटच्या टोकाला वसलेले सुमारे 5000 लोकसंख्येचे हिंगणी गाव आजही अनेक विकासापासून वंचित परंतु हिंगणी गावामध्ये आज सुवर्णयोग आला आहे. केंद्र सरकारच्या पोस्ट कार्यालयाचे नवीन स्वतंत्रपणे हिंगणी येथे मंजुरी मिळून आज प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झाली असल्याने अनेक वर्षांची असलेली मागणी अखेर पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

हिंगणी गावामध्ये नवीन पोस्ट कार्यालय आजपासून सुरू होत असून या कार्यालयामधून विविध शासकीय योजना तसेच लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना डीबीटी द्वारे व्यवहार करण्याची सोय उपलब्ध झाली असून बचत खाते खोलणे, एफडी स्वरूपामध्ये गुंतवणूक करणे, विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे अशा विविध खात्रीशीर योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन डाक अधीक्षिका स्वाती दळवी मॅडम यांनी केले.

हिंगणी गावामध्ये स्वतंत्र पोस्ट कार्यालय असावे अशी मागणी गेले वीस वर्षापासून वर्तमानपत्र व विविध बातमीच्या माध्यमातून आवाज उठविला तसेच दिल्ली केंद्रीय कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार व ईमेलद्वारे पाठपुरावा करून खऱ्या अर्थाने आज प्रत्यक्षात हिंगणी येथे पोस्ट कार्यालय सुरू झाल्याचा आनंद ग्रामस्थांना होत असल्याचे मत पत्रकार अण्णासाहेब कोळी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच गावामध्ये कोणतीही राष्ट्रीयकृत बँक अथवा पतसंस्था बँकिंग स्वरूपामध्ये अद्यापही नसल्याने ग्रामस्थांना पोस्ट बँकेच्या माध्यमातून लाभ होणार असल्याचेही सांगितले.

लवकरच भारत डाकप्रधान देश…

भारतीय डाक विभागाने विद्यार्थ्यासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्कॉलरशिप योजना, पत्रलेखन स्पर्धा, सुकन्या समृध्दी योजना, पीपीएफ खाते, अपघात विमा आदी योजना सुरू केल्या असून, लवकरच भारत हा डाकप्रधान देश होईल, असे मत कराड उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी व्यक्त केले

यावेळी डाक अधीक्षिका स्वाती दळवी,वडूज उपविभागीय डाक निरीक्षक सी एम नदाफ कराड उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख,डाक आवेक्षक अमोल भोकरे
एस. एन. शेडगे, सरपंच संगीता गुलाब सरतापे, आण्णासाहेब कोळी, काकासाहेब माने, बाळासाहेब माने, जालिंदर लोखंडे, अजिनाथ खडतरे, गुलाब सरतापे, सचिन सरतापे, कैलास सरतापे, किरण चव्हाण, नवनाथ चव्हाण,पोष्टमन आगतराव जगताप,पवरा आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *