व्हिजन २४ तास न्यूज चॅनलच्या बातमीचा सकारात्मक परिणाम : रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड उत्तर :
दि. 05/06/2025 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कराड उत्तरमधील रस्त्यांची झालेली दुरवस्था व खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. हे निवेदन तालुकाप्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकाप्रमुख जीवन गायकवाड, अमजद मुसांडे, विशाल कदम, गणेश जांभळे, कृष्णत पवार व इतर शिवसैनिकांनी दिले होते.
या आंदोलनाचा इशारा आणि नागरिकांच्या मागण्यांना व्हिजन २४ तास न्यूज चॅनलने प्रसारित करून व्यापक प्रसिद्धी दिली. या वृत्ताची तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
शिवसेनेकडून तसेच वाहनधारक नागरिकांच्या वतीने बांधकाम विभागाच्या तत्परतेचे व सकारात्मक प्रतिसादाचे कौतुक करण्यात येत असून संबंधित अधिकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या व्हिजन २४ तास न्यूज चॅनलचे विशेषतः आभार मानले जात आहेत.