दहिवडी येथील मतमोजणी केंद्र परिसर ‘पादचारी क्षेत्र’ म्हणून जाहीर

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

दहिवडी, ता. माण –प्रतिनिधी

२५८ माण विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडले असून, मतमोजणी प्रक्रिया दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी शासकीय धान्य गोदाम, दहिवडी (मायणी रोड), ता. माण, जि. सातारा येथे होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेच्या काळात परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा परिसर ‘Pedestrian Zone’ (केवळ पादचारी क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

तालुका कार्यकारी दंडाधिकारी व तहसीलदार विकास अहिर यांनी काढलेल्या आदेशानुसार, मतमोजणी केंद्राच्या चहूबाजूला ५०० मीटर परिसर पादचारी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा आदेश २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू असेल.

दहिवडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांच्या प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, परिसरात रहदारी व अव्यवस्थेची शक्यता लक्षात घेऊन हा प्रतिबंध घालण्यात आला आहे. नागरिकांनी या काळात वाहनांचा वापर टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतमोजणी स्थळ परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!