कराड उत्तर साठी मुंबईमधून राजकीय खलबत्ते……. गोपनीय बैठका व उमेदवारीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कराड कुलदीप मोहिते

सविस्तर वृत्त….. विधानसभेच्या उमेदवारी अर्जाची विक्री सुरू झाली आहे कराड उत्तर साठी व कराड दक्षिणेसाठी नामनिर्देशक अर्ज काही उमेदवारांनी खरेदी केली आहेत कराड दक्षिण साठी इच्छुकांची संख्या कमी आहे पण कराड उत्तर साठी इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अतुल भोसले यांच्यात दक्षिणेत लढत होईल हे जवळजवळ निश्चित झाले आहे त्यांच्यासमोर आणखी कुणाची आव्हान आहे हे काही दिवसातच स्पष्ट होईल परंतु कराड उत्तर साठी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमोर कोणाचा आव्हान असणार कराड उत्तर मध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप किंवा मित्रपक्ष कराड उत्तरची जागा कोणाला जाणार यासाठी मुंबईमध्ये राजकीय खलबत्ते सुरू आहेत अशी मतदारसंघात चर्चा आहे

कराड उत्तर मुळातच चार तालुक्यात विभागलेला मतदार संघ आहे या मतदारसंघात सहकार क्षेत्राशी निगडित राजकीय मंडळी आहेत पाण्याचा प्रश्न साखर कारखान्याचा उसाचा प्रश्न विकास कामाचे श्रेय या मुद्द्यावर कराड उत्तरची निवडणूक यंदा चर्चेचा विषय ठरणार आहे असे राजकीय अभ्यासक सांगतात परंतु कराड उत्तर साठी सध्या इच्छुक उमेदवार वरिष्ठ नेत्यांच्यावर चर्चा करत आहेत मतदारसंघ कोणाला जाणार कोण उमेदवार असणार हे लवकरच स्पष्ट होईल परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून कराड उत्तर साठी आमचाच उमेदवार असेल अशी भूमिका कार्यकर्ते मांडत आहेत कराड उत्तर साठी वरिष्ठ नेत्यांना सुद्धा सावध भूमिका घेत आहेत अखेर शेवटच्या क्षणी उमेदवारीसाठी कोण बाजी मारणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल पण कराड उत्तर साठी अनेकांनी आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!