व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी – सादिक शेख
सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस काका व पोलीस दिदी पथकाच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द येथे एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या या कार्यक्रमात पोलीस अंमलदार श्री. तानाजी चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि स्वसंरक्षणाचे धडे दिले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना ‘पोस्को’ कायद्याचे सखोल ज्ञान देण्यात आले तसेच स्वसंरक्षणाचे महत्व पटवून दिले. मुलींना लैंगिक छळाविरुद्ध कसे तोंड द्यावे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना टोल फ्री नंबर 112 व 1091 वर संपर्क साधून आपल्या तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले.
‘सखी सावित्री’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ट्राफिक शिस्त, चांगला व वाईट स्पर्श, मादक पदार्थांचे सेवन, शारीरिक व मानसिक सुरक्षितता, ताणताणाव व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. श्री. तानाजी चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना भावनिक व मानसिक सुरक्षेचे महत्वही पटवून दिले. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास जागवला गेला.
कार्यक्रमाला उपस्थित मा. श्री. समीर शेख, पोलिस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलिस अधीक्षक सातारा, तसेच मा. अक्षय सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. नदाफ एन.डी. यांनी पोलिस प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि सर्व अधिकारी व मार्गदर्शकांचे आभार मानले.