म्हसवडमध्ये पोलिसांचा अवैध धंद्यांवर घणाघात! दारू, जुगार आणि मटक्यावर एकाच दिवसात जोरदार कारवाई – 12 जणांना बेड्या!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवडमध्ये अवैध धंद्यांचा धुमाकूळ मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पावले उचलली आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अवैध दारू विक्री, जुगार, आणि मटका यावर तडाखेबंद कारवाई करून तब्बल 6 गुन्हे दाखल करत 12 आरोपींना अटक केली आहे!

मटका, जुगार, आणि दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांचा दणका!

विशेष म्हणजे यावेळी मटका घेणाऱ्या ग्राहकांसह मटका मालकांवरही कारवाई करण्यात आली, त्यामुळे आता कुणालाही सुटका मिळणार नाही! म्हसवड पोलिसांनी अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्याची ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

म्हसवड हद्दीतील हिंगणी, विरळी, मासाळवाडी आणि ढाकणी भागात पोलिसांनी छापे टाकून मोठी मोहीम राबवली. दर्शन किराणा दुकानाच्या आडोशाला मटका घेताना तसेच विरळी येथे जुगार पत्ते खेळताना काही जणांना रंगेहात पकडले. तसेच, मोदी आणि जय मल्हार धाब्याजवळ दारू विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, मटका खेळणाऱ्यांसोबत मटका मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी मटका, जुगार आणि दारू विक्री करणाऱ्या 12 आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले!

म्हसवड पोलिसांनी  केलेल्या या मोठ्या कारवाईत अवैध धंद्यांना ठोस इशारा दिला आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध व्यावसायिकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

ही मोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक – अनिल वाघमोडे,पोलीस अंमलदार – देवानंद खाडे, भगवान सजगणे, शशिकांत खाडे, रूपाली फडतरे, निता पळे, मैना हांगे, अमर नारनवर, सुरेश हांगे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले, विकास ओंबासे, युवराज खाडे, राहुल थोरात या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

सपोनि अक्षय सोनवणे – कारवाई सुरूच राहणार!

या जोरदार कारवाईमुळे म्हसवडमधील अवैध धंद्यांची चैन तोडली गेली असली, तरी पोलीस आणखी कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. “अवैध धंदे बंद नाही झाले, तर पुढची कारवाई आणखी गंभीर असेल!”असा इशारा सपोनि सोनवणे यांनी दिला आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!