पोलीस कर्तव्य जनरल चॅम्पियन शिप विजेते पद सातारा जिल्ह्यास प्राप्त*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी.
पोलीस दलामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. असा कर्तव्य मेळावा जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व देशपातळीवर घेण्यात येतो. दिनांक 19/07/2023 ते 21/07/2023 या कालावधीत कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळावा हा पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आलेला होता. सदर पोलीस कर्तव्य मेळाव्याकरीता सातारा, सांगली, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण अशा 5 जिल्हयातुन स्पर्धक सहभागी झाले होते. याकरीता सातारा जिल्हयातुन श्री. संदीप जगताप, पोलीस निरीक्षक, श्री. अविनाश माने व श्रीमती अनिता आमंदे मेणकर सहा. पोलीस निरीक्षक व 22 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.सदर कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सांयटीफीक एड टु इन्व्हेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस
व्हिडीओग्राफी, घातपात विरोधी तपासणी, कॉम्प्युटर अवेरनेस व श्वानांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात यामध्ये सातारा जिल्हा संघाने एकूण 9 सुवर्ण पदक, 7 रौप्य पदक व 4 कांस्य पदके पटकावली. यामुळे सातारा जिल्हयाने कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवून सातारा जिल्हा पोलीस दलाचा नांवलौकीक कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये वाढविला
आहे.मा.श्री.न्यायमूर्ती शाम चांडक जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे यांच्या हस्ते जनरल चॅम्पियन शिप ट्रॉफी स्वीकारताना मा.श्री. समीर शेख सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक.
*स्पर्धा प्रकार*
सदर कर्तव्य मेळाव्यातील चांगल्या कामगिरीसाठी श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. के. एन. पाटील, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवृत्त पोलीस उप अधीक्षक श्री. संभाजी पाटील, श्रीमती मोरे, सपोनि फॉरेन्सीक व पथक, श्री. गौरव वाडे प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण कॉलेजचे फॉरेन्सीक एक्सपर्ट, श्री. वसंत साबळे, सेवानिवृत्त सफौ, श्री. संतोष शिंदे पोहवा आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षकसातारा,श्री.के.एन.पाटील, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!