व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसळा – सुशील यादव
दिवसेंदिवस उष्णतेची लाट आणि सद्याचे ग्लोबल वॉर्मिगचा इशारा पहाता निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड काळाची गरज बनली आहे.जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने त्याचे संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली पाहिजे ह्या स्तुत्य हेतुने रायगड भुषण पुरस्कर्ते समाजसेवक कृष्णा महाडीक यांच्या प्रयत्नाने पंजाब येथील दानशूर उद्योगपती विजय नागरथ, जिजामाता शिक्षण संस्थाप्रमुख महादेवराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे हस्ते शाळा प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आले.
लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी समाजसेवक कृष्णा महाडीक यांनी शाळा शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाने योग्य ती काळजी घेऊन निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन केले.आयोजीत वृक्ष लागवड कार्यक्रमाला मुख्याध्यापक संदिप कांबळेकर,बनोटी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक जयसिंग बेटकर,मेंदडी हायस्कूल मुख्याध्यापक प्रमोद चालके, रुपेश कांबळे,मेघशाम लोणशिकर,वैभव सुतार,भावेश घाणेकर,लक्ष्मण गाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.गावागावात जसे देवालय बांधले जातात तशीच सर्वत्र विद्यालय बांधली पाहिजे तरच ज्ञानात भर आणि देशाची प्रगती होईल या विचाराने प्रेरित होऊन सहा महिन्यापूर्वी समाजसेवक कृष्णा महाडीक यांचे प्रयत्नाने दानशूर व्यक्तीमत्व विजय नागरथ यांच्या सारख्या अनेक मान्यवरांचे आर्थिक सहकार्याने जिजामाता शिक्षण संस्थेला शैक्षणीक साहित्यासह सर्व सुखसोयीनिशी सुबक इमारतीची उभारणी करून मोलाचे योगदान व सहकार्य केले आहे त्या बद्दल संस्था प्रमुख माजी सभापती महादेव पाटील यांनी मनोमन आभार मानले आणि मान्यवरांचे स्वागत केले.