पिंपरी गावाला मिळाली पहिली मराठा महिला सरपंच : सौ. उज्वला ढवळे सरपंचपदी निवड

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
पिंपरी (ता. माण) :
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या नेतृत्वात पिंपरी गावच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या सौ. उज्वला सुरेश ढवळे यांची निवड करण्यात आली. पिंपरी ग्रामपंचायतीच्या इतिहासात त्या पहिल्या मराठा महिला सरपंच ठरल्या आहेत.

या निवडीत युवानेते श्री. दिगंबर राजगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या पुढाकारामुळे ही निवड यशस्वीपणे पार पडली.

नवनिर्वाचित सरपंच सौ. उज्वला ढवळे यांचे व इतर सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपच्या कार्यकारणी सदस्या सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब) यांनी पिंपरी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी ढवळे यांचा सत्कार केला व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असून पुढील वाटचालीसाठी पूर्ण पाठबळ राहील, असा विश्वासही व्यक्त केला.

या कार्यक्रमाला श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजयकाका गांधी, माजी सरपंच कोमल शिरीष राजगे, माजी सरपंच उत्तम माने, नानाशेठ गायकवाड, सुरेश राजगे, आकाराम राजगे, शिरीष राजगे, रामभाऊ राजगे, भारत सातपुते, दाजी करे, श्रीरंग ढवळे, सुरेश ढवळे, माऊली करे, शहाजी अवघडे, अमोल कुंकुले, अविनाश गायकवाड, ऋषीकेश गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही निवड गावातील महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय ठरेल, असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!