व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) विजय ढालपे गोंदवले –
माण तालुक्यातील पिंपरी ता.माण नजीक रात्री दुचाकी आणि पिकप जीप यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार रंगा बिरा राजगे वय तीस वर्ष राहणार पिंपरी हा जागीच ठार झाला सदर अपघाताची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी दिली रंगा बिरा राजगे हा पिंपरी येथील रहिवासी असून पिंपरी पासून दोन किलोमीटर वर मनकर्णवाडी हद्दीत असणाऱ्या लोणार वस्ती नजीक राजगे वस्तीवर राहण्यासाठी आहेत रंगा बिरा राजगे हे त्यांच्या दुचाकी क्रमांक MH 11 AC 6931 वरून रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी ते मोटर चालू करण्यासाठी पिंपरी कडे निघाले होते त्याचवेळी महिंद्रा पीकअप जीप क्रमांक MH 11 CH 0055 ही म्हसवड कडून कोंबड्या घेऊन दहिवडी जात असताना या दोन्ही भरधाव वाहनांचा समोरासमोर अपघात झाला
या अपघातात दुचाकी जीप वर आदळल्याने मोठा आवाज झाला या आवाजाच्या दिशेने पिंपरीच्या ग्रामस्थांनी धाव घेतली आणि अपघात पाहिला यावेळी भीषण अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला यात दुचाकी चालक रंगा बिरा राजगे हा जागीच ठार झाला झाला अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती ही बातमी पिंपरी चे पोलीस पाटील यांनी म्हसवड पोलिसांना सांगताच म्हसवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी उपस्थिती लावून ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला घेत इतर वाहतूक सुरळीत केली सदर अपघाताची फिर्याद पाडुंरंग जिजाबा राजगे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केली सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे