करगणी येथे आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून फार्मासिस्ट दिन साजरा

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

करगणी, प्रतिनिधी:
२५ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी, विटा येथील विद्यार्थ्यांनी करगणी येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले.

यावर्षीची थीम “फार्मासिस्टः जागतिक आरोग्य गरजा पूर्ण करणे” होती. या थीमचा उद्देश जागतिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणे हा होता.

 

या कार्यक्रमात प्रा. अर्चना मलारकर आणि ऐश्वर्या शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण, प्रभात फेरी तसेच फार्मासिस्टांचा सत्कार आयोजित केला. पथनाट्यातून अंधश्रद्धा निर्मूलन, ब्रँडेड आणि जेनरिक औषधे यांमधील फरक, औषधांचे नियमित सेवन न केल्याचे दुष्परिणाम, तसेच व्यसनाधीनतेचे परिणाम यावर जनजागृती करण्यात आली.

पथनाट्य सादर करणारे विद्यार्थी रोहित पवार, गौरव पवार, हर्षद जगदाळे, अतुल कोळेकर, प्रथमेश जाधव, पारस भोळे, प्रज्वल गायकवाड, यश चव्हाण, गणेश कांबळे, ऋतुजा पाटील, क्षितिजा सरगर, हर्षदा चोथे, स्नेहल काटकर, भक्ती लवटे, आकांक्षा चंदनशिवे, कोमल पोकळे, वैष्णवी येडगे, प्रणाली हजारे, अनुजा बाबर, आकांक्षा विसापुरे यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या कार्यक्रमास करगणी गावच्या सरपंच सुरेखा तात्यासाहेब होनमाने, उपसरपंच साहेबराव खिलारे, सदस्य अण्णा रामचंद्र सरगर, मुद्दसर दिलावर इनामदार, नाथा सरगर, युवा कार्यकर्ते रमेश मंडले आणि राहुल होनमाने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य डॉ. निरंजन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!