प्रेयसी सोबत लग्नकरणेसाठी प्रियकराने प्रेयसीच्या पतीचा गळा आवळुन केला खुन:फलटण शहर पोलीसांनी केला ६ तासात खुनाचा तपास उघड.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
सादिक शेख (पोलीचे टाइम्स रिपोर्टर )
गोंदवले खुर्द :
प्रेयसी सोबत लग्नकरणेसाठी प्रियकराने त्याचे साथीदारासह प्रेयसीच्या पतीचा गळा आवळुन
केला खुन.त्यांचे हातपाय दोरीने बांधुन त्यास निरा कॅनॉलमध्ये टाकुन अंत्यत क्लिष्ट अशा गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण तपास करुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे दाखल बेवारस अनोळखी मयताचे खुनाचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन ६ तासामध्ये उघड केला
याबाबत फलटण शहर पोलीस ठाणे तून मिळालेली माहिती
दिनांक – १७/०९/२०२३ रोजी रात्री ०८.०० वा. चे सुमारास श्री सिध्दीनाथ गणेश तरुण मंडळ शिवाजीनगर फलटण येथुन इसम नामे अजित पोपट बुंरुगले वय २४ वर्षे रा नगरपरीषद शाळा क्रमांक ०७ चे पाठीमागे शिवाजीनगर, फलटण, जि. सातारा हा घरात कोणास काही एक न सांगता कोठेतरी निघुन गेला आहे. तो अघाप पर्यत परत आला नाही. तरी माझे मिंसीग मुलाचा शोध व्हावा म्हणुन वगैर मजकुरची मिसिंग पोपट आप्पा बुरुगले यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे दिली होती. त्याप्रमाणे मिसींग रजिस्टर नंबर ६६ / २०२३ प्रमाणे दिनांक १८/०९/२०२३
रोजी दाखल करण्यात आला होता.सदर मिंसीग दाखल झाल्यानंतर मा. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक सोो, फलटण शहर पोलीस ठाणे
यांनी मिंसीग तपास मपोना १६०९ बोबडे यांचे कडे देण्यात आलेला होता. मिसीग तपास करत असताना दिनांक
१९/०९/२०२३ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत विडणी ता.फलटण गावचे हद्दीमध्ये दाखल मिंसीगचे वर्णनाचे एक अनोळखी बेवारस प्रेत मिळुन आले. त्याप्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे १५१०/२०२३ भा.द.वि.स. कलम ३०२,२०१ प्रमाणे दिनांक १९/०९/२०२३ रोजी १४.१३ वा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील प्रमाणे फलटण शहर पोलीस ठाणे मिसीग रजि नंबर ६६ / २०२३ मधिल मिसीगचे वर्णन व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे मधिल मिळुन आले अनोळखी बेवारस मयताचे वर्णन व कपडे यांचे साधर्म्य असल्याने सदर मिंसीग तपास कामी पोलीस ठाणे कडील पो.उप.नि शिंदे यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची खास नियुक्ती करुन मिसींग व्यक्तीचे सी.डी.आर चे तांत्रीक विश्लेषण तसेच मिंसीग इसमाचे पत्नीकडे अंत्यत कसोशिन व कौशल्यपुर्ण तपास करुन मिसीग तपासामध्ये मयत अजित पोपट बुंरुगले रा. शिवाजीनगर फलटण यांची पत्नी हिचे आरोपी नामे करण विठ्ठल भोसले रा. थेऊर रोड संस्कती हॉटेलच्या मागे, केसनंद, पुणे यांचे प्रेमसंबंध होते. सदर प्रेमसंबधास व लग्न करणेसाठी तिचा पती हा अडथळा येत असल्याने आरोपीने त्यांचे साथीदार राहुल उत्तम इंगोले वय २२ वर्षे रा. लोहमार्ग
रोड बालाजी ट्रेडर्सचे समोर, वाघोली पुणे यांचे मदतीने यातील मिंसीग व्यक्ती अजित बुंरुगले यांस फलटण येथे घरातुन बाहेर फोन करून बोलावुन घेवून त्यांचा साथीदार यांचे मदतीने मिंसीग अजित बुरुगले यांचा दोरीने गळा आवळुन त्यानंतर त्यांचे हात पाय दोरीने बांधुन पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने त्यांस निरा उजवा कॅनॉल मध्ये टाकुन देवुन त्यांचा खून केला आहे. अशी कबुली आरोपी करण विठ्ठल भोसले यांने दिली असुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथील दाखल गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचे अधिक तपासामध्ये आरोपी करण विठ्ठल भोसले रा. थेऊर रोड संस्कती हॉटेलच्या मागे, केसनंद, पुणे २. शिवानी अजित पोपट बुंरुगले वय १९ वर्षे रा. शिवाजीनगर फलटण ता फलटण जि सातारा यांस अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा अधिक तपास श्री सुनिल शेळके पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे हे करत आहेत.
सदरची कामगीरी मा.श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सोो सातारा, मा. बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक सोो, सातारा, श्री राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी सोो, फलटण भाग फलटण, श्री. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सुरज शिंदे, पोहवा.२११ वाडकर, पोहवा ११८३ धापते, पोना ५९४ जगताप, पोकॉ १९५१ पाटोळे, पोकॉ २७०१ कर्णे, पोकॉ २५१५ खराडे, मपोना १६०९ बोबडे, मपोना १४८ वाघ, मपोना ७७३ फाळके, मपोकॉ २०८३ करपे यांनी सदरची कारवाई केली आहे.