शिवतीर्थाला धक्का न लावता लोकनेते बाळासाहेब देसाई या नावाने नव्याने आयलँड तयार करणार- पालकमंत्री
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
सातारा,
-शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता पूर्वीच्या परंतु आत्ता काढून टाकण्यात आलेल्या आयलँडच्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे नव्याने आयलँड तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पोवईनाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई आयलँड सुशोभीकरण करण्याबाबत आढावा बैठक नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख,नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
युनायटेड वेस्टर्न बँकेचे पूर्वी एक आयलँड होते हे आयलँड ग्रेड सेपरेटच्या कामांमध्ये काढून टाकण्यात आले आहे. त्याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आयलँड तयार करण्यात येणार आहे. यामध्ये बगीचा यासह अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून आयलँड तयार करण्यात येणार आहे. याबाबत राजघराण्याची काय शंका असल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल असेही पालकमंत्री श्री देसाई यांनी सांगितले.