पानवण ता. माण येथे जातिवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी आरोपींना अटक
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी) –
माण तालुक्यातील पानवण येथे झालेल्या जातिवाचक शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटनेप्रकरणी म्हसवड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात गु.र.नं. 68/2025 अन्वये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ.जा.ज.का.) व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील
१४ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ७ ते ७.४५ दरम्यान भोजलिंग ढाब्यावर फिर्यादी भोजलिंग महादेव तुपे (वय २३, रा. पानवण) व त्यांचे मित्र जेवणासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी विजय छबु चव्हाण, अनिल लक्ष्मण चव्हाण आणि त्यांच्या इतर साथीदारांनी फिर्यादी आणि त्यांचे मित्र राहुल राजू तुपे यांना जातिवाचक शिवीगाळ करत काठी व कुऱ्हाडीने गंभीर मारहाण केली. यात राहुल तुपे यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून फिर्यादीच्या उजव्या पायासह पाठीला आणि डाव्या हाताला मार लागला आहे.
१५ मार्च २०२५ रोजी रात्री ४:५४ वाजता गुन्हा दाखल झाला. तपासाअंती १६ मार्च रोजी आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना वडूज न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत यांनी सांगितले की, “हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.”

