श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी संस्थांतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या संस्थेतील विविध विद्यालयातील 45 विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्कृती कला शिक्षण संस्था ,कराडचे संस्थापक मा.नितीन कुंभार होते. त्यांनी फोटोग्राफीच्या गमतीजमती प्रात्यक्षिकाद्वारे दाखविल्या व फोटोग्राफी एक करिअर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव शेती मित्र मा. अशोकराव थोरात यांनी जीवनामध्ये कलेचे महत्व सांगितले.
काव्यशास्त्र विनोदी धिमताम या सुभाषिताप्रमाणे काव्य शास्त्र विनोद यामुळे जीवन शांत व यशस्वी जगता येते म्हणून प्रत्येकाने आपल्या मधील कला जोपासली पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. अरुणा कुंभार यांनी व सूत्रसंचालन सौ. सविता पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक बिझी बुरुंगले यांनी मानले. चित्रकला स्पर्धा यशस्वीतेेसाठी विद्यालयाचे कलाशिक्षक राजेंद्र पांढरपट्टे यांनी विशेष परिश्रम घेतले.