चितळीमध्ये माजी सैनिकांचा आक्रोश; रणजीत निकम हत्येच्या निषेधार्थ मोर्चा, कुटुंबाला आर्थिक मदत

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते

सातारा (ता. खटाव )
    खटाव तालुक्यातील चितळी गावचे सुपुत्र स्वर्ग:रणजीत निकम यांची दि.18/2/2026 रोजी हत्या झाली त्यांना जीवे मारण्यात आले यांच्या हतेच्या निषेधार्थ निषेध रॅली व श्रद्धांजली सभा तसेच सैनिक आक्रोश मोर्चा नियोजन बैठक संपन्न झाली.

  या वेळी सर्व महाराष्ट्रातील माजी सैनिक संघटनेच्या वतीने माजी सैनिक रणजीत निकम यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध यावेळी करण्यात आला व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

   या श्रद्धांजली सभेमध्ये सर्व माजी सैनिक संघटनाचे अध्यक्ष व पदाधिकारी व माजी सैनिक यांनी एकच शासनाला व प्रशासनाला मागणी केली की तात्काळ आरोपीची कसून चौकशी करण्यात यावी त्यांना कोणी सहकार्य केलेत् यांना सह आरोपी बनवावे व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा व माजी सैनिक रणजीत निकम यांच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन द्यावे व पालक मंत्री सातारा व माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिल्याप्रमाणे दि.4 मार्च 2026 च्या आत स्वर्गवासी माजी सैनिक रणजीत निकम यांचे कुटुंबीय व माजी सैनिक संघटना अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक तात्काळ लावण्यात यावी व तसे न झाल्यास माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात येईल सैनिक मोर्चा काढण्यात येईल. तरी तत्काळ याची दखल शासन व प्रशासनाने घ्यावी अशा श्रद्धांजली सभे मध्ये भावना व्यक्त करण्यात आल्या.

       या प्रसंगी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रशांत कदम माजी सैनिक मा.जिल्हाध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष, त्रिदली सैनिक संघटना यांच्या वतीने जिल्हा अध्यक्ष दत्ता माळी,पुणे जिल्ह्यातून भारतीय माजी सैनिक संघटना अध्यक्ष रामदास मदने व प्रशांत राजे साहेब सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक संघटना पांडुरंग भोसले, पुणे देहू माजी सैनिक संघटना उपाध्यक्ष शिवराज सकपाळ,सातारा तालुक्याच्या वतीने सैनिक संघटना अध्यक्ष संजय निंबाळकर, प्रवीण शिंदे, कॅप्टन संतोष धुमाळ,खटाव तालुक्याच्या वतीने धनाजी आम्ले व प्रेमचंद जगताप, .राजकुमार शिंदे. सत्यवान पटोळे,अध्यक्ष माजी सैनिक संघटना, कराड तालुक्याच्या वतीने माजी सैनिक संघटना अध्यक्ष श्री राजाराम माळी व शिवाजी माने, श्री.रवींद्र घाडगे, श्री धनाजी पाटील, नि.सुभेदार जगन्नाथ मोहिते, श्री भीमराव सावंत,पाटण तालुक्याच्या वतीने अध्यक्ष माजी सैनिक संघटना कॅप्टन उत्तम चव्हाण व श्री संतोष यादव, सदाशिव जाधव,सांगली तासगाव तालुका अध्यक्ष अरविंद शिंदे, कॅप्टन अर्जुन लिंगले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष, कडेगांव तालुका अध्यक्ष . विजय भोसले ,कोरेगाव तालुक्याच्या वतीने माजी सैनिक संघटना अध्यक्ष श्री संतोष भोसले,ASC कोरचे माजी सैनिक विजय दळवी, सांगली विटा सैनिक संघटना महिला अध्यक्ष सुर्वे मॅडम व स्वर्ग: माजी सैनिक रणजीत निकम यांच्या पत्नी व बंधू सेवारत सैनिक अमोल निकम या सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व सर्व महाराष्ट्रातील माजी सैनिक संघटना माजी सैनिक व कुटुंबिय,शहीद जवान कुटुंबीय त्याचे नातेवाईक मित्र परिवार बहुसंख्येने या श्रद्धांजली सभा व निषेध रॅली साठी उपस्थीत होते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *