व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते शिवडे( उंब्रज)
कराड
ग्रामपंचायत कार्यालयास शिवसेना ( शिवडे ) व ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊनही ग्रामपंचायत कार्यालयाने कानाडोळा केल्यामुळे शिवडे शिवसेना, ग्रामस्थ ,यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयास निवेदन देऊन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीचे निवारण न झाल्यास , ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आलेला आहे,

शिवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत बालाजीनगर येथे सांडपाणी, ड्रेनेजचे पाणी तसेच पाणी जाण्यासाठी रस्त्यात खांदलेल्या चरी^ यांच्या मुळे तेथील रहिवासी व येजा करणाऱ्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन जीविताला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. .ग्रामपंचायत कार्यालयास शिवडे ग्रामस्थांच्या वतीने आज पर्यंत 5 ते 6 वेळा अर्ज करुन निवेदन देऊन तोंडी सूचना दिल्या गेल्या आहेत तरी सुद्धा त्या ठिकाणी परिस्थिती जसेच्या तसे आहे त्यामुळे दिनांक 26/01/2024, रोजी शिवडे ग्रामपंचायतच्या कार्यालयाला शिवसेना व ग्रामस्थ व रहिवाशांचे वतीने ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार आहे तरी त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचातीची राहिल असे संजय भोसले शिवसेना उपतालुकाप्रमुख व शिवडे ग्रामस्थ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी संजय भोसले, निवास जाधव, शंकरराव घार्गे ,अशपाक मुल्ला, संभाजी घाडगे, महादेव भोंगाळे, महादेव खामकर, शरद कचरे, भरत कांबळे .व शिवडे ग्रामस्थ उपस्थित होते.