महिला व बालकांचा सर्वांगीण विकास हाच निर्धार घेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सालाबाद प्रमाणे म्हसळा तालुक्यात बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी कन्या शाळा पटांगणात दुपारी ३.३० वाजता “आदिती महोत्सवाचे “आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवात खास करून महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे औचित्याने सिने अभिनेत्री पल्लवी वैद्य यांच्या उपस्थितीत हिंदी मराठी कोळी गितांचा सदाबहार नृत्याचा गुलकंद ऑर्केस्ट्राचे सादरीकरण होणार आहे.महोत्सवात तालुक्यातील महीला बचत गटाचे माध्यमातुन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे.महीला बचत गटांना त्या करित असलेल्या उद्योग व्यवसायात प्रेरणा देण्यासाठी लकी-ड्रॉ काढून आकर्षक बक्षिस वितरण करण्यात येईल अशी माहिती म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा मिना टिंगरे यांनी माहिती देताना सांगितले. आयोजीत कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन अध्यक्षा मिना टिंगरे यांनी केले आहे.