सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने म्हसळा शहरातील ग्रामीण रुग्णालयात दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.स शिबिराचा जास्तीजास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
शिबिरात ब्लड प्रेशर,शुगर,हृदयाची इसीजी तपासणी, मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप,आरबीएस रक्ततपासणी,ठरावीक औषधे,स्त्रियांचे विविध आजार व तज्ञांचा सल्ला याच बरोबर अँनजियो ग्राफी, अँजिओप्लास्टी,मूत्रमार्ग शस्त्रक्रिया, डायलीसीस,हार्णीयाची शस्त्रक्रिया,बायपास,कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया,हृदयाला असलेले छिद्र,मणक्याच्या शस्त्रक्रिया,कॅन्सर शस्त्रक्रिया, गर्भपिशवी दुरूस्ती आदी आजारांच्या तपासण्या मोफत करुण मिळणार आहेत
त्याच बरोबर आयोजीत शिबिरात केलेल्या तपासणीअंती रुग्णाला वरील कोणतेही आजार आढळून आल्यास त्या वरील उपचार व शस्त्रक्रिया नामांकित शासकीय व निमशासकीय तसेच खाजगी रुग्णालयात करण्यात येईल असे प्रसिध्दी पत्राद्वारे ना.आदिती तटकरे यांनी कळवले आहे.
अधिक माहितीसाठी म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष समीर बनकर मो. नंबर ८७६७४०३३५१ किंवा महीला अध्यक्षा मिना टिंगरे मो.नंबर ९८८१३८७७६७ यांच्याकडे संपर्क साधण्याचे कळविले आहे.