प्रोजेक्ट अमृत अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन रविवार, दिनांक 25 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 08:00 वाजता सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात यमुना छठ घाट, आई. टी. ओ. दिल्ली येथून केला जात आहे.
या परियोजनांतर्गत संत निरंकारी मिशन सातारा झोन मधील निरा नरसिंहपुर (ता. इंदापूर) येथील त्रिवेणी घाट परिसरात साफसफाई करण्यात येणार असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले. रविवारी होणाऱ्या स्वच्छ जल, स्वच्छ मन परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बारामती इंदापूर परिसरातून मोठ्या संख्येने निरंकारी अनुयायी भाग येणार असल्याचे असल्याचेही श्री झांबरे यांनी सांगितले.
संत निरंकारी मंडळाचे सचिव तथा समाज कल्याण विभागाचे प्रभारी श्री.जोगिन्दर सुखीजा यांनी या विषयी माहिती देताना सांगितले, की ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेत ही परियोजना अवघ्या भारतवर्षात जवळपास 1500 पेक्षा अधिक ठिकाणी 27 राज्यें व केंद्र शासित प्रदेशांतील 900 शहरांमध्ये एकाच वेळी राबविली जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठे सुरक्षित ठेवण्याच्या विकल्पांबाबत जनसामान्यांना जागृत करुन येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य स्वस्थ करणे हा आहे.
बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायी शिकवणूकीचे अनुसरण करत संत निरंकारी मिशन मार्फत स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ वर्ष 2023 मध्ये केला आहे. या परियोजनेचा मुख्य उद्देश जलसाठ्यांचे संरक्षण, त्यांची स्वच्छता व जनसामान्यांमध्ये याविषयी ‘जागरूकता अभियान’ राबवून त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे.