माणदेशात भाटकी येथे केशर आंबा उत्पादन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड,

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी दहिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने माणदेशातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, 19 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता भाटकी (म्हसवड) येथील अजित शिर्के पाटील यांच्या प्रक्षेत्रावर होणार आहे. या शिबिरात दहा ड्रम पद्धतीचा वापर करून आंबा उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.

शेतकऱ्यांसाठी या प्रशिक्षणात आंबा उत्पादनाच्या आधुनिक व सोप्या पद्धतीवर मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच दहा ड्रम पद्धतीद्वारे आंबा उत्पादनात वाढ करण्याचे तंत्रज्ञान समजून घेता येईल.

प्रमुख मार्गदर्शक:
श्री. भूषणकुमार यादगीवार, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

प्रमुख उपस्थिती:
श्रीमती भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा
श्री. सुहास रणसिंग, उपविभागीय कृषी अधिकारी, फलटण
श्री. अक्षय गार्डे, तालुका कृषी अधिकारी, दहिवडी

माण तालुक्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!