म्हसळा तालुक्यातील वाडीवस्तीचा विकास एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकतो – आमदार अनिकेत तटकरे 

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सुशील यादव
रायगड प्रतिनिधी
म्हसळा – ;
          खासदार सुनील तटकरे,महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने व त्यांच्या विकास निधींतून म्हसळा तालुका पंचायत समिती आंबेत गणात विकास कामांची गंगा अवतरली आहे.खामगांव परिसरातील अवघ्या दोन ते तीन किलो मीटर अंतरावरील गाव वाडी वस्तीवरील मंजुर विकास कामांचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.
         मंजुर कामांमध्ये प्रामुख्याने सोनघर पाणी पुरवठा योजना २५ लक्ष रुपये खर्चाचे उदघाटन व अंगणवाडी इमारत भूमिपूजन ११ लक्ष,खामगाव ते लेप गवळवाडी रस्ता ४० लक्ष रुपये खर्चाचे भूमिपूजन,कणघर पाणी पुरवठा २४ लक्ष व ७ लक्ष रुपये खर्चाचे सभामंडपाचे उदघाटन आणि लेप येथे रस्ता बांधकाम ४० लक्ष रुपये खर्चाचे भूमिपूजन असे सुमारे  दिड कोटी रुपयांचे विकास कामांचे भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले.
 
                  या वेळी स्वागत कार्यक्रमात आमदार अनिकेत तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात खास करून सर्वच तालुक्यांतील वाडीवस्तीचा सर्वांगीण विकास हा एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन करण्यात आला आहे.अन्य कोणताच विरोधी पक्ष येथे विकास कामे करीत नसल्याने गेल्या पाच वर्षात पहिल्या टप्प्यातील सर्वच कामांची पूर्तता करण्यात आली आहे आता गावांतील ग्रामस्थानी उर्वरीत मागणी केलेल्या छोट्या मोठ्या कामांसाठी मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातुन २५/१५ अंतर्गत शासनाकडून २० कोटी रुपयांचे निधीची मागणी करण्यात आली आहे हा निधी उपलब्ध होताच प्रस्तावित विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला जाईल असेही आमदार अनिकेत तटकरे यांनी खामगाव परिसरातील ग्रामस्थांना आश्वासन दिले. गावांत विकास कामे होत असताना सर्वच ग्रामस्थानी गावाचे सुशोभीकरण करण्यावर अधिक लक्ष दिला असल्याने त्यांचे कामाचे कौतुक केले.खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातुन मतदार संघात करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून रस्ते,पाणी,आरोग्य आणि शिक्षणा बरोबरच अन्य विकास साधला आहे.यामुळे पर्यटन विकासाला चालना,रोजगानिर्मिती होत आहे.
 
                 आयोजीत कार्यक्रमात जिल्हा चिटणीस महादेव पाटील,तालुका अध्यक्ष समीर बनकर,अल्प संख्यांक सेल अध्यक्ष नाझिम हसवारे,जीप माजी सभापती बबन मनवे,माजी सभापती उज्वला सावंत,जीप माजी सदस्या वैशाली सावंत,जेष्ठ नेते अंकुश खडस,व्यंकटेश सावंत,माजी सभापती संदिप चाचले,जीप बांधकाम उपअभियंता प्रविण मोरे,अभियंता भगत,जीप पाणी पुरवठा स.अभियंता रोहन माळी,आंबेत गणअध्यक्ष संतोष नाना सावंत,महेश घोले,माजी सभापती संदिप चाचले,बिलाल कौचाली,सरपंच कणघर रश्मी सावंत,सरपंच खामगाव प्रियंका निंबरे,उपसरपंच गिता गायकर,सरपंच लेप स्नेहा शिगवण,प्रसन्ना निंबरे,बाळकृष्ण सावंत,नारायण मालप,मतदार संघ महीला अध्यक्षा सोनल घोले,जिल्हा चिटणीस रेश्मा काणसे,सरपंच वनिता खोत,महिला अध्यक्षा मिना टिंगरे,लेप अध्यक्ष महादेव गायकर,माजी सरपंच मधुकर लाड,धनंजय सावंत,रामकृष्ण सावंत,शेखर खोत आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार अनिकेत तटकरे यांनी या वेळी विरोधकांचा खरपुस समाचार घेताना मागील वेळी निवडणूक कालावधीत बॅरिस्टर अंतुले यांना वेडे वाकडे बोलणारे आज त्यांचा पुलका आल्या सारखे बोलत आहेत पण त्यांच्या मनात काय आहे हे जाहीर करून सांगितले.आमच्या माध्यमातुन मतदार संघात विकास किती आणि कोणी केला हे जनतेला माहिती आहे आगामी लोकसभा मतदार संघातून रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे हेच असतील असे ठणकावून सांगितले.
*प्रस्तावित विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. – आमदार अनिकेत तटकरे 
*म्हसळा तालुका पंचायत समिती आंबेत गणात विकासाची गंगा,दिड कोटी रुपयांचे विकास कामांचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन सोहळा संपन्न.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!