शेतकऱ्यांच्या संमत्ती शिवाय एक गुंठा ही जमीन अधिग्रहण होणार नाही : संजय सोनवणे —- देशमुखांनी डब्बल ढोलकी वाजवू नये*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
शेतकऱ्यांच्या संमत्ती शिवाय एक गुंठा ही जमीन अधिग्रहण होणार नाही त्या गोष्टीची प्रभाकर देशमुखानी काळजी करु नये .त्याला आ.गोरे सक्षम आहे.तुमच्या सारखे डब्बल ढोलकी ते वाजवत नाहीत काय असेल ते तोंडावर मागे कुरघोड्या करत नाहीत असे प्रतिपादन माजी नगरसेवक संजय सोनवणे यांनी केले
नुकत्याच प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन नियोजित एमआयडीसी करीता सुरु असलेल्या जमीन मोजणी वेळी शेतकऱ्यानी केलेल्या आंदोलन संदर्भात लोकप्रतिनिधी नी समन्वयक होऊन मार्ग काढावा अशाप्रकारे केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक सोनवणे बोलत होते ते पुढे म्हणाले
म्हसवड मध्ये केंद्र सरकारची कॉरिडॉर एम.आय.डी.सी मंजूर करताना रामराजे नी प्रचंड विरोध केला.त्यावेळी हेच प्रभाकर देशमुख मग गिळून गप्प बसले होते.तेच देशमुख आज शेतकऱ्याचा मला किती कळवळा आहे हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करताहेत.माण तालुक्यात कित्येक वर्षापासून लोकांना रोजगार नाही पाणी नाही अशा परिस्थितीत जगायला जाण्याशिवाय पर्याय ही नव्हता.केंद्र सरकारने कॉरिडॉर मंजूर केला.त्यावेळेस रामराजे आणि आ.जयकुमार गोरेचा संघर्ष अख्य्या महाराष्ट्राने बघितला. जयाभाऊ नी अक्षरशःओढुन माण मध्ये हा कॉरिडॉर मंजूर केला.त्यावेळेस तुम्ही कुठे होता.हजारो कोटी ची गुतवणुंक ह्या कॉरिडॉर मध्ये होणार आहे.25 ते 50 हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.अशा वेळेस रामराजे नी हा कॉरिडॉर कोरेगाव तालुक्यात नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला.त्यावेळी हे देशमुख साहेबांच्या पार्टीची राज्यात सत्ता होती.रामराजेच्या समोर ह्यांची बोलायची हिम्मत होती का?
आज तेच शेतकऱ्यांच्या बाजूने कळवळा असल्यागत दाखवत आहेत.मुळात हे महाशय कलेक्टर होते आयुक्त होते ह्यांना माहिती आहे.शासन कोणतीही जागा अधिग्रहण करताना बागायती/घरे असणारी जमीन घेत नाही.आता सर्वेक्षण सुरू झाले आहे.तरीही हे महाशय शेतकऱ्यांची दिशाभूल करून राजकारण करायचं प्रयत्न करताहेत.ज्या शेतकऱ्यांना ते तुम्ही भिऊ नका म्हणताहेत आणि आंदोलन करायला लावून आपली डब्बल ढोलकी वाजवायचा प्रयत्न करताहेत.त्यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत हे महाशय पुण्यात आणि इथं लोकांना तुम्ही भिऊ नका म्हणायचे.मुळात शेतकरी आंदोलन करत आहेत हे देशमुख साहेबांना माहीत नव्हते का?दोन दिवस अगोदर प्रांताधिकारी एम.आय.डी.सी चे प्रमुख पोलिस आधिकारी यांच्या समवेत मासाळवाडीत बैठक झाली.त्यावेळेस हे कोठे होते?त्यावेळेस प्रशासन विरोधात कोणीही जाऊ नये.अशा सूचना दिल्या गेल्या होत्या
गुन्हे दाखल झाल्यावर हे दुसऱ्या दिवशी येताहेत आणि खोटा शेतकऱ्यांचा कळवळा दाखवताहेत यायचे होते.तर लोधवडे म्हसवड पासून 20 मिनिटाच्या अंतरावर आहे.आंदोलन च्या वेळेस कुठे गायब होते ?मुळात त्याचा जो आरोप आहे शेतकऱ्यांना विश्वासात घेवून जमिनी घाव्या.ह्यांना माहिती आहे दोन वेळा कलेक्टर बरोबर शेतकऱ्यांची मिटिंग झाली त्यात कलेक्टर साहेबांनी स्पष्ट सांगितले होते.समत्ती असल्याशिवाय कोणतेही जमीन अधिग्रहण करणार नाही.त्यानंतर प्रांताधिकारी च्या बरोबर शेतकऱ्यांच्या मीटिंग झाल्या त्यात ही अशाच पद्धतीची चर्चा झाली.शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायचा पूर्ण प्रयत्न केला गेला.हे देशमुख आज जागे झालेत .हे म्हणताहेत लोकप्रतिनिधी नी समन्वयक होऊन मार्ग काढावा हो लोक प्रतिनिधी त्या गोष्टीला सक्षम आहेत कुणावर ही अन्याय होणार नाही शेतकऱ्यांच्या संमत्ती शिवाय एक गुंठा ही जमीन अधिग्रहण होणार नाही त्या गोष्टीची तुम्ही काळजी करू नका.त्याला आ.गोरे सक्षम आहे.तुमच्या सारखे डब्बल ढोलकी ते वाजवत नाहीत काय असेल ते तोंडावर मागे कुरघोड्या करत नाहीत.
ह्यांची महाराष्ट्रात सत्ता होती त्यावेळेस ह्यांनी माण खटाव मध्ये 1 रुपयाचाही निधी आणला का?आणला असेल तर सांगावे.ह्यांनी येणारे जीहे कठापुरचे पाणी अडवले.त्यांचे होणारे टेंडर थांबवले अशा माणसानं कॉरिडॉर साठी आपली भूमिका काय?कॉरिडॉर होवू द्या का नाही कायम देशमुख कनफ्युज असतात.आपण माण खटाव साठी काय केले का?एकीकडे नुसते म्हणायचे कॉरिडॉर झाला पाहिजे तिकडे शेतकऱ्यांना उलटे सुलटे शिकवून एम.आय. डी सी. ला विरोध करायला लावायचे हे धंदे बंद करावेत.जे कॉरिडॉर साठी प्रयत्न केले त्यात तुम्ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ला किमान एक पत्र दिलेले दाखवा तुम्हीच लोकांना उठवून कॉरिडॉर झाला पाहिजे म्हणताय.मोर्चे काढायला लावताय. तुम्ही रोजगार मेळावे घेताय पुण्यात नौकरी साठी आणि इथे होणाऱ्या कॉरिडॉर ला विरोध करायला लावताय. माण मधला युवक आता तुम्हाला ओळखून आहे .तुमच्या या डब्बल ढोलकीला आणि तुम्हीच परत शेतकऱ्यांना खोटी माहिती देवून लोकांना अडकवताय किमान एखादे तरी पुण्य बांधून घ्या माण खटावकरांचे कॉरिडॉर म्हसवड मध्येच होणार आणि शेतकऱ्यांना विना संमती शिवाय एक गुंठा ही जाणार नसल्याचे सोनवणे यांनी सांगीतले