पंढरपूर – सातारा महामार्गावर धुळदेव हद्दीतील शेतकऱ्यांचे सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्युज म्हसवड (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड 
धुळदेव हद्दीतील बाधित शेतकऱ्यांना भूसंपादन कार्यालयाकडून तातडीने मोबदला मिळावा यासाठी पंढरपूर – सातारा महामार्गावर  शेतकऱ्यांनी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता
     याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी धुळदेव तालुका माण येथील मागासवर्गीय शेतकरी वसंत महादेव खाडे यांनी उपविभागीय अधिकारी दहिवडी यांना धुळदेव हद्दीतील पंढरपूर सातारा महामार्ग nh448 ही या रस्त्यामध्ये धुळदेव येथील सुमारे पंधरा शेतकऱ्यांची दहा एकर जमीनीतून महामार्ग तयार करण्यात आला आहे मात्र अद्याप पर्यंत संबंधित शेतकऱ्यांना  कोणताही मोबदला मिळालेला नाही
     जिल्हाधिकारी सातारा भूसंपादन कार्यालय सातारा यांना वेळोवेळी अर्ज करूनही कुठल्याही अधिकारी वर्गाने याबाबत कोणतीही दखल घेतली  नव्हती तसेच उपविभागीय अधिकारी दहिवडी यांना५ एप्रिल रोजी दहिवडी येथे समक्ष जाऊन अर्ज दिला असता त्यावेळी दोन महिन्यात मोबदला देतो म्हणाले मात्र त्यांनीही याकडे डोळेझाकच केली अनेक वेळा लोकशाहीच्या मार्गाने उपोषण केली मात्र प्रत्येक अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन दिले मात्र कुणीही याबाबत तोडगा काढलेला नाही वसंत खाडे या मागासवर्गीयाच्या गट नंबर ५०३, ५०४, ३९६ या गटामधून रस्ता केला गेलेला आहे यामुळे या मागासवर्गीय शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झालेले आहे
      प्रत्येक वेळेला अधिकारी वर्गाने मोबदल्याचं नुसतं गाजरच दाखवून शेतकऱ्यांना झुलवत ठेवलेला आहे पाच वर्षे झाली तरी मोबदला न दिल्यामुळे आज सातारा पंढरपूर महामार्गावर धुळदेव या ठिकाणी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले यावेळ म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनी विभुते यांनी संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून व उपविभागीय अधिकारी दहिवडी यांच्याशी फोनवरून चर्चा करून उद्या शेतकऱ्यांना दहिवडी येथे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेण्यात आल्याचे सांगितले मात्र एक तास झालेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!