लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त म्हसवड येथे करण भैय्या पोरे यांची उपस्थिती

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
प्रतिनिधी, म्हसवड

म्हसवड येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील थोर क्रांतिकारक, लोककवी, साहित्यिक आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास युवक नेते करण भैय्या पोरे हे विशेष उपस्थित राहिले होते.

कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. करण भैय्या पोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची आठवण करून देताना सांगितले की, “अण्णाभाऊ साठे हे सामाजिक परिवर्तनाचे खरे शिल्पकार होते. त्यांनी आपल्या लेखणीतून व लोककलेतून शोषित, वंचित, गरीब जनतेला आवाज दिला. त्यांच्या विचारांवर चालणं म्हणजेच खरं राष्ट्रनिर्माण आहे.”

या कार्यक्रमात युवक नेते करण भैय्या पोरे, राम नरळे, बंटी खाडे, रत्नदीप शेटे ,सागर नामदे, दिनेश गोरे, चेतन धवन आदी प्रमुख मान्यवरा सह मंडळाचे कार्यकर्ते व सहकारी , उत्सव समितीचे सदस्य व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांचा व विचारांचा आदरपूर्वक स्मरण करत सामाजिक एकतेचा संदेश दिला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!