*रक्षाबंधन दिवशी एका अनोळखी भावा कडून अनोळख्या बहिणीला मिळाली आगळी वेगळी भेट*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
नितिन वाडेकर
म्हसवड
*काल रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला.यावेळी प्रत्येक बहिण आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी आपापल्या माहेरी जाऊन आपल्या भावाच्या आयुष्याची दोरी बळकट व्हावी यासाठी देवाकडे मागणे सुद्धा मागत असते. अशीच एक बहिण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी भावाकडे गेली व राखी बांधून परतत असताना तिचा माळशिरस जवळ नकळत त्या बहिणीच्या साडीचा पदर गाडीच्या पाठीमागील चाकात अडकला आणि ती माऊली फरपटत ओढली जाऊ लागली. कशी बशी त्या मुलाने गाडी थांबवली पण, त्या माऊलीची साडी बऱ्यापैकी सगळीच फाटली होती, गाडीचा अपघात झाल्याने बघ्यांची तोबा गर्दी जमली होती, ती माऊली साडी फाटल्याने लज्जा झाकण्यासाठी आपले दोन्ही बाहू आपल्या छातीला गच्च धरून मान खाली घालून रडत होती.*
*अशा वेळी म्हसवड येथील अहिंसा पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री दिपक मासाळ साहेब आपल्या अर्धांगिनी सह आपल्या बहिणीकडे व बायकोच्या भावांकडे राखी बांधून परत म्हसवड कडे येत असताना त्यांनी हा प्रकार पाहिला क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या अर्धांगिनी ने आपल्या भावाने दिलेली नवी कोरी साडी त्या भगिनीला देऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. दीपक मासाळ साहेब व त्यांची पत्नी यांच्या याअनोख्या कार्याचे सर्वत्र प्रशंसा होत आहे