१८ लाख ४० हजार ५०० रुपयाची फसवणूक करणाऱ्या रिच आधार कंपनीच्या चेअरमन वर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड

म्हसवड प्रतिनिधी:
सांगली येथील रिच आधार कंपनीचे चेअरमन सतीश बंडगर यांनी वरकुटे मलवडी  येथील  २ जन व म्हसवड  पुकळेवाडी येथील प्रत्येकी एक अशा चार जणांची    १८ लाख४० हजार ५००  रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार  महादेव सुदाम काटकर रा.  वरकुटे मलवडी ता.माण यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिल्याने रिच आधार कंपनीचे चेअरमन सतीश बंडगर यांच्यावर म्हसवड- पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला  असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
एका वर्षात दुप्पट रक्कम देतो असे सांगून अनेकांची लुबाडणूक करणाऱ्या रीच आधार कंपनीच्या चेअरमन वर गुन्हा दाखल झाला असून म्हसवड पोलीस  गुन्हेगाराचा शोध घेत आहे अशी माहिती म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार भुजबळ व पोलीस उपनिरीक्षक भंडारे यांनी दिलेली आहे.

घडलेल्या गुन्हयाची म्हसवड  पोलीस ठाण्यातून मिळालेली   माहिती अशी,

दिनांक जानेवारी २०२१  पासुन ते नोव्हेंबर  २०२२ पर्यंत रिचआधार मल्टीट्रेडर्स अँन्ड डेव्हलपर्स एल.एल.पी., सांगली चे चेअरमन सतिश काका बंडगर, रा.निर्मीती रेसिडेन्सी.फ्लॅट नं G-1,संजय नगर पोलिस स्टेशन मागे चिंतामणी नगर सांगली याने वेळोवेळी  महादेव सुदाम काटकर रा.वरकुटे मलवडी ता.माण  यांची रुपये     ६ लाख ५० हजार रक्कमेची तसेच , हणमंत सोपान खरात रा.वरकुटे मलवडी ता.माण जि.सातारा यांची   १ लाख ६० हजार  रुपये ,  पोपट बयाजी मिसाळ, रा.वरकुटे मलवडी ता.माण जि.सातारा यांची    २ लाख २० हजार  रुपये ,  शितल आप्पासाहेब पुकळे,रा.पुकळेवाडी ता. माण जि. सातारा यांची ४ लाख – रुपये, व  राजकुमार महालिंग डोंबे, रा.म्हसवड ता.माण ,जि.सातारा यांची ४ लाख १० हजार ५००   रुपये अशी नमुद ४ लोकांची मिळुन १८ लाख४० हजार५००  – रुपये रक्कमेची परतावा निश्चतपणे परत देण्याचे आश्वासन देवुन विश्वास संपादन करुन आर्थिक फसवणुक केली आहे. म्हणुन महादेव सुदाम काटकर   यांनी रिचआधार मल्टीट्रेडर्स अँन्ड डेव्हलपर्स एल.एल.पी., सांगली चे चेअरमन सतिश काका बंडगर, रा.निर्मीती रेसिडेन्सी.फ्लॅट नं G-1,संजय नगर पोलिस स्टेशन मागे चिंतामणी नगर सांगली व डायरेक्टर व फाउंडर यांचे विरुध्द म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली .अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!