मुस्लिम समाज म्हसवडच्या वतीने माण खटाव चे आमदार श्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन पुसेसावळी दंगलीतील मयत नुरुल हसनच्या कुटुंबियांना न्याय आणि आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात आले. या भेटीमध्ये मुस्लिम समाजाने आमदार गोरे यांना कुटुंबाच्या हालअपेष्टा आणि त्यांच्या न्यायाच्या मागण्यांचे महत्त्व समजावून सांगितले.
आमदार जयकुमार गोरे यांनी कुटुंबाच्या वेदना समजून घेतल्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आर्थिक मदत मिळवून देण्याचे वचनही दिले, जेणेकरून नुरुल हसनच्या कुटुंबियांची तातडीने आर्थिक गरज भागवता येईल.
या बैठकीत दहिवडीचे सोहेल भाई, म्हसवड चे माजी नगरसेवक आकिल भाई काझी, शौकत भाई मुल्ला, आसिफ हाजी राजीवली मुजावर, असद मुल्ला, फिरोज शेख, सोहेल मुल्ला, सलाहुद्दीन काझी, आणि अशरफ आसिफ मुजावर उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन कुटुंबाच्या समस्यांवर चर्चा केली आणि समाधानासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे ठरविले.
ही घटना मुस्लिम समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी केलेल्या प्रयत्नांचे एक उदाहरण आहे. स्थानिक नेते आणि प्रतिनिधींनी सामाजिक एकोपा दाखवत या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे कुटुंबियांना तातडीने न्याय मिळवून देण्याची शक्यता वाढली आहे