महाराष्ट्र राज्य नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने शिंपी समाज महामंडळा च्या अध्यक्ष पदा साठी सुनील पोरे(सातारा)यांच्या नावाची एकमुखी शिफारस : सातारा जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला
सातारा प्रतिनिधी:
सुनील पोरे यांची समाजाप्रती असलेली भावना व कार्यतत्परता त्यांनी केलेले काम पाहता जिल्ह्या पुरते मर्यादित कार्य न करता त्यांच्या कामाची छटा महाराष्ट्र भर उमटावी या साठी महाराष्ट्र राज्य नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने शिंपी समाज महामंडळाच्या अध्यक्ष पदा साठी सुनील पोरे(सातारा)यांच्या नावाची एकमुखी शिफारस करणार असल्याची घोषणा ना स प चे राज्याचे अध्यक्ष संजय नेवासकर यांनी केली
      सातारा येथे वसंत भोजनालय हॉल येथे सातारा जिल्हा कार्यकारिणी च्या निवडी संदर्भात बोलाविण्यात आलेल्या सभेत ही घोषणा करण्यात आली यावेळी सातारा जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली संजय नेवासकर यांनी यावेळी ना स प च्या कार्य विषयी माहिती देऊन पुढील कामकाजाची दिशा ध्येय उद्धीष्ट व समजपयोगी कार्याची निश्चिती कशी करायची याची माहिती देऊन सुनील पोरे यांनी सातारा जिल्ह्यात समाज एकत्रित केला हेच तंत्र वापरून आपण संपूर्ण महाराष्ट्रात समाज एकीकरण करणार असल्याचे सांगून ना स प ही शिंपी समाजाची सर्वात जुनी मातृसंस्था असून अनेक समाजोपयोगी कार्य परिषदेकडून घडली असल्याचे स्पष्ट केले
ना स प चे नूतन जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर सुनिलजी पोरे साहेब यांनी नामदेव शिंपी समाज विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माण खटाव मतदार संघांचे जलनायक आमदार कॅॅबिनेट मंत्रिपद मिळालेले जयकुमारजी गोरे भाऊ यांच्याकडे सातत्याने केलेला पाठपुरावा महत्वाचा ठरला असून सुनील पोरे यांच्या सह आशा अनेकांनी महामंडळ स्थापने साठी प्रयत्न केले असल्याचेही नेवासकर यांनी स्पष्ट केले.


या वेळी सुनील पोरे यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व समाजाने दिलेल्या बळावर आपण हे कामकाज करत असून पदे हा विषय जबाबदारी चा असला तरी सर्व समाजातील घटक हा पदाधिकारी असल्याचे नमूद करून आपण शिंपी समाजात आपल्या बळावर आणखी उत्साहाने कार्य करणार असल्याची ग्वाही अध्यक्ष सुनील पोरे दिली .
या वेळी अनेक मान्यवरांची समयोचित भाषणे झाली यावेळी समाजाचे जेष्ठ नेते बाळासाहेब आंबेकर,एकनाथ सदावर्ते, विजय कालेकर,वसंतराव खुर्द,दिलीप लंगडे,प्रवीण शित्रे, महेश बागडे,विक्रांत डोंगरे,श्रीकांत आंबेकर,सुभाष भांबुरे, शेखर हेंद्रे,श्रीकांत मूळे,सतीश वेल्हाळ,अवसरे सर,धनंजय बारटक्के, अर्जुन फुटाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी राज्य अध्यक्ष संजय नेवासकर यांनी सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांची नावे जाहीर केली
सातारा जिल्हा नासप कार्यकारणी…
इंजि सुनील श्रीधर पोरे अध्यक्ष,(म्हसवड),श्रीकांत गजानन फुटाणे सरचिटणीस,( पाटण),डॉ मकरंद प्रफुल्ल पोरे मुख्य समन्वयक (वाई ),प्रमोद शामसुंदर बेंद्रे उपाध्यक्ष ( सातारा) ,विजय भिकूशेठ चांडवले खजिनदार ( म्हसवड) ,संदीप महादेव धोंगडे सदस्य ( कोरेगांव),मनोज मोहन बारटक्के सदस्य ( लोणंद) ,गजानन दिगंबर लंगडे समन्वयक ( पारगाव खंडाळा),अविनाश कारंजकर सदस्य ( मेढा ),किरण जयंत कांबळे सहसचिव ( वडूज),विजय उत्तम पिसे सदस्य ( कलेढोण ),अविनाश वसंत गोंदकर सदस्य (महाबळेश्वर),निलेश सारंगधर महाडिक सदस्य ( पांचगणी),अनिल परशराम भांबुरे सदस्य ( कराड),अतुल अनिल बारटक्के उपाध्यक्ष ( कराड) ,भास्कर नामदेव चौगुले सदस्य ( वाई) , महेश मधुकर हेंद्रे सदस्य ( फलटण),सुनील महादेव पोरे सदस्य ( फलटण ),मनोज मुरलीधर महाडीक सदस्य ( सातारा),किशोर दिलीप हिरवे सदस्य (मोरगिरी),निलेश नामदेव कोकणे सदस्य ( दहीवडी),प्रदीप नामदेव पोरे सदस्य ( कराड),पांडुरंग मनोहर बाचल सहखजिनदार ( पुसेसावळी),प्रमोद विश्वनाथ मुळे समन्वयक ( वावरहिरे) अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.नूतन कार्यकारिणीतील सर्वांना मानचिन्ह,शाल,श्रीफळ, बुके व नियुक्ती पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रारंभी श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणकरून सभेला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यातील निमंत्रित समाज बांधव उपस्थित राहिले.सूत्रसंचालन किरण कांबळे यांनी केले शेवटी आभार विजय चांडवले यांनी मानले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!