धनगर समाजाच्यावतीने सातारा- पंढरपूर महामार्गावर येथील शिंगणापूर चौकात सुमारे एक तास रास्ता रोको

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक : अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी

       राज्य सरकारने केंद्राकडे धनगड ऐवजी धनगर या शब्दाच्या दुरुस्तीची शिफारस केंद्राकडे करावी या प्रमुख मागणीसाठी तिघा युवकांनी१४ दिवसांपासून उपाेषण सुरू केले आहे. या उपोषणाची तीव्रता सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी धनगर समाजाच्यावतीने सातारा पंढरपूर महामार्गावर येथील शिंगणापूर चौकात सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

              या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज माळशिरस तालुक्यातील शेकडो धनगर बांधव मोटार सायकल रॅली काढून आंदोलकांना भेटायला व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. माळशिरस तालुक्यातील व माणतालुक्यातील बनगरवाडी, शिरताव व इतर गावातून आलेल्या धनगर समाज बांधवांनी आज साडेबाराच्या सुमारास एकत्रीत येत सातारा पंढरपूर महामार्गावरील येथील शिंगणापूर चौकात सुमारे तासभर या महामार्गावरील वाहतूक रोखून धरत आपल्या मागण्या सरकारला कळाव्यात व सरकारने आंदोलनाला प्रतिसाद देऊन धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावे यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

          रास्तारोको आंदोलन सातारा पंढरपूर महामार्गावर करण्यात आल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काहीकाळ प्रवाशांना ताटकळावे लागले. एक तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व वाहतूक सुरळीत झाली.

     यावेळी महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती तर धनगर समाज बांधव ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!