व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
पाटण चाफळ प्रतिनिधी
जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे सर्वाधिक पक्षांतर आणि पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. नुकतेच पाटण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे माजी बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना नेते आणि सातारा जिल्ह्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटात प्रवेश केला आहे. सततचे होणारे पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये धोकादायक ठरू शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विक्रमसिंह पाटणकर आणि शंभूराज देसाई यांच्यात पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे यांच्यातील शह काटशहच्या राजकारणामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील राजकारण कायमच तापलेले पाहायला मिळते. नुकतेच पाटण तालुक्यातील कोचरेवाडी येथील सरपंच व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विक्रम सिंह पाटणकर गटाला सोडचिट्टी देत पर्यटन मंत्री शंभूराजे यांच्या उपस्थितीत मरळी येथे शिवसेना शिंदे गट पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी. यमुना मोहिते, रामचंद्र मोहिते, हनुमंत मोहिते, बापूराव मोहिते, दादासो मोहिते, लक्ष्मी मोहिते, पार्वती मोहिते, मानसिंग मोहिते,यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी शंभूराजे यांनी सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे, रवी कुमार तावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. वाय पाटील, शिव दौलत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, पाटण बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, माझगाव ते उपसरपंच गोरख चव्हाण, शिवाजी बोंगाणे,मनोहर कडव, दाढोलीचे युवा कार्यकर्ते संभाजी डांगे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ देखील उपस्थित होते.