व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड : धोंडीराम वाघमारेंनी सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेऊन काम केले. तुम्ही त्यांचे छान स्मारक उभारले आहे, त्यानिमित्ताने अभय वाघमारे कोण हे जनतेला समजले आहे. आता धोंडीराम वाघमारेंचा विचार घेऊन समाजासाठी काम करा, माण तालुक्याला त्याची आवश्यकता आहे. असा सल्ला शरदचंद्र पवार यांनी दिला.
तत्कालीन माण-फलटण विधानसभा मतदार संघांचे आमदार, उरमोडी-जिहे काठापूर सिंचन योजनांचे जनक स्व.धोंडीराम वाघमारे यांच्या स्मारकाचे उदघाटन राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. त्यानिमित्ताने धोंडीराम वाघमारे यांचे सुपुत्र अभय व त्यांच्या कुटुंबीयांनी पुणे येथे शरदचंद्र पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली व आभार मानले. त्यावेळी शरदचंद्र पवार यांनी अभय यांचे कौतुक करून पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पवार साहेब म्हणाले, की सामान्य, गरीब परिवारात जन्मलेल्या धोंडीराम वाघमारेंनी माण-फलटण तालुक्यातील जनतेसाठी अखंड संघर्ष केला व आपल्या आमदारकीच्या काळात अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या कार्याचे स्मरण राहावे म्हणून तुम्ही त्यांचे छान स्मारक उभारले आहे. आता त्यांचा विचार-वारसा पुढे नेण्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय काम करा. अभय वाघमारे कोण आहेत हे, लोकांना कळले आहे. यापुढे मुंबईतील व्याप थोडा कमी करून माण, खटाव व फलटणकडे लक्ष द्या, असा सल्ला यावेळी पवार साहेबांनी दिला.
यावेळी अभय वाघमारे यांच्या सोबत त्यांच्या आई श्रीमती निर्मला वाघमारे, बहीण सोनाली व क्रांती उपस्थित होत्या. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन पवार साहेबांचे आभार मानले.