माळशिरस तालुक्यात वोट साठी नोट ची होणार बरसात तालुक्यातून महा जंबो चर्चा, माळशिरस तालुक्या मधून लिढ घेण्यासाठी फार मोठ्या धन लक्ष्मी चे दर्शन घडणार असल्याची चर्चा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) शौकत पठाण माळशिरस
सद्या संपुर्ण देशात माढा लोकसभा निवडणुकीची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.माढयातील उमेदवार लीड घेऊन निवडून आणला पाहिजे यासाठी नोट लो वोट दो हा फॉर्म्युला वापरला जाणार अशी चर्चा माळशिरस तालुक्यातील मतदार राजातून होत आहे.
माढा लोकसभा मतदार संघाची निवडणूक हि प्रतिष्ठेची बनली असून घराणेशाही विरुद्ध खोटेशाही अशी बनल्यामुळे माळशिरस तालुक्यात मतासाठी नोटांची बरसात होणार आहे.असे मतदार राजातून बोलले जात आहे. गेल्या सत्तर वर्षात कधी लोकसभा निवडणुकीत लक्ष्मी दर्शन झालेले ऐकले ही नाही आणि पाहिले ही नाही. त्यामुळें माळशिरस तालुक्यातील मतदार राजा हा वोट साठी नोट ची वाट पाहत आहे. जर नोट नाही तर वोट नाही अशी कुजबूज सुरू आहे.त्यामुळें माळशिरस तालुक्यातील मतदार हा नोट आली तरच वोट देण्यासाठी बाहेर पडणार आहे असे मतदारातून बोलले जात आहे.
माढा लोकसभा मतदार संघात सहा तालुके येतात यांपैकी पाच तालुक्यातून मुख्य दोन उमेदवारांना कमी जास्त प्रमाणात मतदान झाले तर माळशिरस तालुक्यातून ज्यांना लीड मिळेल तो उमेदवार निवडून येणार असे समीकरण माढा मतदार संघाचे आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यात जो उमेदवार पैशाचा पाऊस पाडेल तो विजयी नक्की अशी पार्श्वभुमी माढा लोकसभा मतदार संघाचीआहे.
सद्या मतदार फार हुशार झाला असून निवडणूक आली का यांना विकास सुचतो निवडणूक संपली का विकास हा संपतो अशी भावना मतदाराची झाल्यामुळे मतदान हे श्रेष्ठ दान याला बाजूला ठेऊन आदी नोट मग मत अशामुळे सद्या मतदार हा नोटची वाट पाहतोय. जर नोट नाही आली तर वोट पण येणार नाहीअसे मतदारातून बोलले जात आहे.