म्हसवड प्रतिनिधी भारत सरकारने नुकत्याच म्हसवड शहरातील वकिलांच्या नोटरी पदी नियुक्त्या केल्या आहेत त्या सर्व वकिलांचा सत्कार नुकताच अहिंसा पतसंस्थेमध्ये घेण्यात आला.
यावेळी म्हसवड बार असोसिएशन अध्यक्ष पदी ॲड. कापसे यांची निवड झाल्याबद्दल व देविदास मासाळ हे विधिज्ञ झाले बद्दल त्यांचाही सत्कार चेअरमन नितीन दोशी यांचे हस्ते भेट वस्तू व सहकार स्कार्फ देऊन करण्यात आला. ॲड. कापसे, ॲड. देविदास मासाळ, ॲड. निसार काझी, ॲड. हांगे , ॲड. सौ राऊत, ॲड.संतोष भोसले, ॲड. शेटे. यांचा प्रथमत: सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी सन्माननीय सत्कार मूर्ती, पत्रकार आण्णासाहेब टाकणे, संचालक महावीर व्होरा, अजित मासाळ ,प्रीतम शहा , गब्बर काझी, हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यावेळी म्हणाले भारत सरकारने नोटरी पदी नव्याने नियुक्ती केलेल्या वकिलांमुळे म्हसवड शहरातील वाढत्या कामकाजामुळे नागरिकांना सहजगत्या सुविधा प्राप्त झाली आहे.नोटरी सेवा सर्वसामान्यांना परवडेल अशा वाजवी दरात मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. म्हसवड शहर व परिसरातील सामाजिक जडणघडणीत शहर बार असोसिएशनचाही नेहमी सहभाग असतो ही अभिमानाची बाब आहे .
यावेळी पत्रकार आण्णासाहेब टाकणे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. निसार काझी ॲड. हांगे यांनी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केली.
अहिंसाचे व्यवस्थापक दीपक मासाळ ॲड.गुरव, संतोष टेके, यशोधर व्होरा, जयंत राऊत व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षय धट यांनी व आभार बाबू मुल्ला यांनी मानले