गोदातीरावर छठ पूजेचा भक्तिमय सोहळा — हजारो महिलांकडून उदय सूर्याला अर्घ्य अर्पण

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज प्रतिनिधी अहमद मुल्ला,

नांदेड / उध्दव सरोदे

नांदेड – गोदावरी नदीकाठी बंदा घाट येथे पारंपारिक श्रद्धा, भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडवणारा छठ पूजेचा सोहळा यंदा अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी पहाटे अशा दोन सत्रांत हजारो भाविक उपस्थित राहिले.

       धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते आरतीला प्रारंभ झाल्यानंतर तीन दिवसांचा कठोर उपवास संपवत महिलांनी मंगळवारी पहाटे उदय होत असलेल्या सूर्यदेवाला गुडघ्यापर्यंत पाण्यात उभे राहून अर्घ्य अर्पण केले. आकाशात फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि शंखनादाने वातावरण दुमदुमून गेले. नंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेत भक्तिभावाने व्रताची सांगता केली.

      या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर प्रसाद, उपाध्यक्ष एस. के. झा, सचिव मनोज ठाकूर व कोषाध्यक्ष रामप्यारे शर्मा यांनी उपवास करणाऱ्या महिलांचा सत्कार केला.

     संध्याकाळच्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल, भाजप नेते अरविंद भारतीया व मुन्नासिंग तेहरा, लायन्स रीजनल सेक्रेटरी गंगाबिषण कांकर, युवा व्याख्याता शांभवी साले, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, अमृता जायस्वाल, संध्या छापरवाल, हुकूमसिंग गहलोत आदी मान्यवर उपस्थित होते.

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महापालिकेच्या वतीने सुभाष कुकडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जीव रक्षकांनी दक्षता घेत सुरक्षिततेची काळजी घेतली. आयोजनात संजीव जिंदल, सचिन मित्तल, अशोककुमार दास, मनोजकुमार सिंह, संजय त्रिपाठी, प्रेमजी पागल पानवाले, जितेंद्र निषाद, हरेराम साहा, रजनीश दुबे आदींचा मोलाचा सहभाग होता.

      पहाटेपासून अमित रंजन झा, विनय शर्मा, ब्रजराज झा, नवलकुमार, गोपालप्रसाद सिंह, अजितकुमार सिंह, शैलेंद्र निगम, राजेश विश्वकर्मा, शिवा यादव, राधेश्याम विश्वकर्मा, दिनेश शर्मा, उमेश विश्वकर्मा, रामजीत सहानी, सुनील मिश्रा, महेश विश्वकर्मा, छोटू पाल, कार्तिक विश्वकर्मा, चंदन कुमार व मुकेश अग्रवाल यांनी गोदातीरावर उपस्थित राहून महाप्रसादाचे वितरण केले.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. दिलीप ठाकूर म्हणाले,“नांदेडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर छठ सण साजरा होत असल्याचे पाहून अभिमान वाटतो. तीन दिवस पाण्याचा घोट न घेता उपवास करणाऱ्या मातृशक्तीचे हे एक अद्भुत उदाहरण आहे. ‘प्राकृतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड’ गेली १५ वर्षे हा सण भव्यदिव्य पद्धतीने साजरा करत आहे, हे नांदेडकरांसाठी अभिमानास्पद आहे.”

        बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल येथून आलेले तसेच नांदेड जिल्ह्यात कार्यरत हजारो उत्तर भारतीय बांधव या सोहळ्यात सहभागी झाले. गोदावरी तीरीचा हा नयनरम्य आणि भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नांदेडकर उपस्थित राहिले.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *