शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुण्यात महाआक्रोश मोर्चा!
व्हिजन २४ तास न्यूज
BY ; Vitthal Katkar
कुकुडवाड ;प्रतिनिधी
राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी 13 फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत, या मोर्चासाठी राज्यभरातून शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित राहणार असून सातारा जिल्यातील सेवकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षकेतर महामंडळाचे राज्याचे सहकार्यवाहक शिवाजीराव खांडेकर यांनी केले आहे.
माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर प्रत्येक वेळी सरकारने अन्याय केला आहे. त्यांच्यावर कामाच्या महत्वाच्या जबाबदाऱ्य देऊन, काम करवून घेतले जाते मात्र त्यांच्यावर वेतनश्रेणी देताना अन्याय केला जातो,म्हणून विविध मागण्याकडे सरकारच लक्ष वेधण्यासाठी १३ फेब्रुवारी रोजी शनिवार वाडा ते आयुक्त कार्यालय असा महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सरकारकडून शिक्षकेतर कर्मचारी भरती वरील बंदी उठवावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील तरतुदी प्रमाणे १०,२०,३०,या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळावा, अनुकंपा नोकर भरती करावी,अर्जित रजेचा लाभ देऊन रजा साठविण्याची कमाल मर्यादा वाढवून द्यावी,तर शिक्षक मतदार संघात मतदान करण्याचा अधिकार मिळावा अशा विविध मागण्या या महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने व सहकार्य वाहक शिवाजी खांडेकर यांनी दिली आहे.
चौकट :-माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कमी वेतन देऊन राबवून घेतले जाते, त्यांच्या वेतनश्रेणीत वर्षानुवर्षे त्रुटी राहिल्या आहेत, हा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही, सातव्या वेतन आयोगातील १०,२०,३० , या योजनेचा लाभपासून फक्त माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी वंचित आहे.म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा असून सातारा जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने या मोर्चासाठी हजर रहावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे पदाधिकारी अनिल माने, रमेश इंगवले,इम्रान मुल्ला, संजय पवार, संतोष पोळ यांनी केले आहे.