मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये: आप्पासाहेब पुकळे

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड

म्हसवड नगरपरिषद कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात एक आढावा बैठक पार पडली. माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रनिहाय समितीचे अध्यक्ष मा. आप्पासाहेब पुकळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

या बैठकीत म्हसवड नगरपरिषद हद्दीतील चौदा अंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी, नगरपरिषद कर्मचारी तसेच म्हसवड शहरातील विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मा. आप्पासाहेब पुकळे यांनी योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्या. कोणताही लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले. उपस्थित सर्व अधिकारी, अंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी, व बँक व्यवस्थापकांनी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे आश्वासन दिले.

मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!