कॉल नाही, मेसेज नाही, कोणत्याच लिंकवर क्लिक नाही पण तरीही बँक खात्यातून ६१ हजार २०० रु झाले गायब!
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड :
सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील. लोकांना फसवून बँक खात्यातून लाखो, कोट्यवधी रुपये लुटले जातात. अगदी टेक्स्ट मेसेज पाठवून लोकांना फसवल्याच्या घटना समोर येत असतात. पण म्हसवड मध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेत मात्र एका प्राथमिक शिक्षकाची वेगळ्याच पद्धतीने फसवणूक झाली.
त्यांना कोणत्याही अनोळखी नंबरवरून फोन किंवा मेसेज आला नव्हता, तसेच त्याने कोणत्याही लिंकवर क्लिक केलं नव्हतं, तरी त्याच्या खात्यातून चोरट्यांनी ६१ हजार २०० रु. लांबवले. सायबर स्कॅमच्या या प्रकरणात एका प्राथमिक शिक्षकाचे बँक अकाउंट अनोख्या पद्धतीने रिकामं करण्यात आलं.
म्हसवड मधिल प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले शिवाजी चिलाप्पा बिडगर रा. भाटकी, (गाडेकरवाडी), ता. माण, जि. सातारा यांची ऑनलाइन फसवणूक झाली. त्याच्या खात्यातून जवळपास ६१ हजार २०० रुपये चोरीला गेले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी
शिवाजी चिलाप्पा बिडगर हे जि.प.प्राथमिक शाळा म्हसवड येथे शिक्षक म्हणून काम करत असून त्यांचे म्हसवड येथील भारतीय स्टेट बैंक येथे सेव्हींग खाते नं. ३१७२१८१३०१९ हे खाते असून त्या खातेवर ६१ह्जार २३० रु.३२ पैसे रक्कम शिल्लक होती. सदरचे खाते फोन पे व गुगुल पे ला लिंक केलेले आहे. मोबाईल नंबर लिक आहे. त्या खात्यावर मोबाईलवरती ता. २८/११/२०२३ रोजी पासून बिडगर यांनी मोबाईल नंबरवरुन फोन पे व गुगुल पे वरुन व्यवहार करणेचे प्रयत्न ता. ३०/११/२०२३ रोजी पर्यंत केला. परंतू त्यारुन कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही अगर कोण्त्याही प्रकारचा मॅसेज आला नाही.त्यामुळे बिडगर यांना वाटले बँकेचा सरवर डाऊन असल्याने व्यवहार होत नसतील म्हणून त्यांनी दोन ते तीन दिवस कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. त्यानंतर मोबाईलवरुन फोन पे, गुगुल पे वरुन व्यवहार होत नाहीत म्हणून व ए टी एम कार्ड मार्फत पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात देखिल पैसे निघत नसल्याने बिडगर यांनी ता. ०१/१२/२०२३ रोजी बँकेमध्ये चौकशी करणेसाठी गेले असता त्यावेळी त्यांच्या खात्यातुन ता. २८/११/२०२३ रोजी रक्कम रुपये ६१,२००/- ऑनलाईन काढलेचे निदर्शनास आले. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या मॅसेजेसला रिप्लाय दिलेला नाही अगर कोणताही ओटीपी दिलेले नसताना सुध्दा त्यांच्या खात्यारुन ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर होऊन रामकिशन या व्यक्तीच्या नावे एच डी एफ सी बँकेचे खातेमध्ये गेल्याचे भारतीय स्टेट बैंक शाखा म्हसवड यांनी खात्याचा तपशील दिलेनंतर बिडगर यांना समजले
या झालेल्या ऑनलाईन फसवणूकी बाबत त्वरीत बिडगर यांनी २ डिसेंबर रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून त्यात म्हटले आहे की माझी संबंधीत व्यक्तीने ऑनलाईन खात्यावरुन त्याचे खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर करुन जाणीव पूर्वक फसवणूक केलेली आहे. तरी माझी संबंधीत व्यक्ती विरुध्द तक्रार असल्याने त्वरीत माझे प्रस्तुतचे तक्रार अर्जावरुन चौकशी होऊन संबंधीत व्यक्तीवर सायबर क्राईम अंतर्गत योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी. व माझी रक्कम मला वसुल होऊन मिळावी अशी विनंती केली आहे