माणदेशी’ च्या वतीने नितिन दोशींचा सत्कार*
व्हिजन २४ तास न्यूज
BY ; Ahmad Mulla
म्हसवड; प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या निमंत्रित सदस्य पदी अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांची नियुक्ती फेडरेशनचे अध्यक्ष श्री.काकासाहेब कोयटे यांनी केली.
या निवडीसाठी नितिन दोशी यांचा माणदेशी परिवारा मार्फत नुकताच सत्कार माणदेशी महिला बँक व माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.चेतनाजी सिन्हा (भाभी) यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी चेतना सिन्हा म्हणाल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था ही राज्यातील सहकार चळवळ समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते पतसंस्थाची ती आधार आहे अश्या राज्य पातळीवरील फेडरेशन च्या संचालक मंडळावर काम करण्याची संधी नितिनभाई दोशी यांना मिळाली ही फार मोठी बाब आहे. या माध्यमातून सहकारात चांगले काम होईल याची मला खात्री आहे.
यावेळी माण देशी फौंडेशन व बँकेचा स्टाफ उपस्थित होता.
श्री.नितिन दोशी यावेळी म्हणाले मला जी संधी मिळाली आहे त्याचा उपयोग पतसंस्था चळवळ समृद्ध करण्याचा प्रयत्न करीन माझा माणदेशीने केलेला सत्कार हा माझा परिवारीत सत्कार आहे.