अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांचा दीपस्तंभ पुरस्काराने देऊन सन्मान
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व सेवा भावी कार्याची नोंद घेऊन पतसंस्था फेडरेशनच्या वतीने अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांना दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये नुकताच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर व दीपस्तंभ पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व सेवा भावी कार्याची नोंद घेऊन पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दीपस्तंभ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या वर्षीचा दीपस्तंभ पुरस्कार अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांना प्रदान करण्यात आला. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, महासचिव आप्पासाहेब राजोबा, गोदावरी अर्बन संस्थेच्या अध्यक्षा व भाजपा नेत्या सौ.राजश्री ताई पाटील, चंद्रकांत वंजारी, सुरेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, अहिंसा पतसंस्थेचे संचालक अभिराज गांधी, महेश पतंगे तसेच महाराष्ट्रातील विविध पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दोन दिवसीय शिबिरात सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. या दरम्यान सहकार क्षेत्रातील विविध आव्हानांवर मात करण्यासाठी नव्या उपाययोजनांवर विचार मंथन झाले. प्रशिक्षकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले आणि पतसंस्थांच्या कारभारातील सुधारणा व नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी नितिन दोशी यांनी पुरस्कारासाठी कृतज्ञता व्यक्त केली आणि सहकार क्षेत्रात अधिक उत्तम कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि आगामी काळात सहकार क्षेत्रात अधिक प्रगती होण्याच्या शुभेच्छा दिल्या.